आष्टी(प्रतिनिधी)
नाशीक येथील वसंत सोशल फाऊंडेशनचा
राज्यस्तरीय क्रांतीवीर वसंतराव नाईक
पुरस्कार २०२३ मुंबईचे
राजेंद्र वनवे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.निर्मळ मनाने,सेवाभावी वृत्तीने अव्याहतपणे सुरु असलेल्या कामाची दखल घेतली आहे.शिक्षण,सामाजिक,
आरोग्य,समाजप्रबोधन जनसेवा या विविध माध्यमातून करत
असलेल्या कर्तृत्वामुळे हा पुरस्कार जाहिर झाला आहे.वनवे यांंच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.वनवे यांंचे निःस्वार्थ सेवाकार्य जनसामान्यांना दीपस्तंभासारखे ठरणार आहे असे डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी सांगीतले.
*प्रदेश कमिटी महाराष्ट्र
अध्यक्षपदी राजू वनवे यांची निवड*
****************
नवी मुंबईतील जय
भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे
अध्यक्ष राजेंद्र निवृत्ती वनवे यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल
घेऊन ऑल इंडिया ट्रक ऑपरेटर वेलफेअर असोसिएशन राष्ट्रीय
अध्यक्ष अशोक शर्मा व राष्ट्रीय सेक्रेटरी वी.एम.जैन यांच्या उपस्थितीत राजेंद्र निवृत्ती वनवे यांना
भाईचारा ऑल इंडिया ट्रक ऑपरेट वेलफेअर असोसिएशनच्या प्रदेश
कमिटी महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड
करण्यात आलेली आहे.
0 टिप्पण्या