
आष्टी (प्रतिनिधी) सरपंच
परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेचे मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार आज रविवार दि.३
डिसेंबर रोजी पुणे येथे राज्याचे ग्राविकास मंत्री गिरीश महाजन,खा.डॉ.श्रीकांत
शिंदे,ग्राविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,पोपटराव पवार यांच्या हस्ते
देण्यात येणार आहेत.यामध्ये आष्टी तालुक्यातील रुईनालकोलचे सुपुत्र ग्रामविकास
अधिकारी आबासाहेब खिलारे यांना "आदर्श ग्रामसेवक पुरस्कार " देऊन सन्मानीत करण्यात
येत आहे.भारत देश हा गाव खेड्यांचा समजला जातो.त्यामुळे देशाची प्रगती ही ग्रामीण
भागातील सर्वांगीण प्रगतीवर अवलंबून आहे.पंचायत राज व्यवस्थेमुळे थेट
ग्रामपंचायतीपर्यंत विकास निधी पोहोचवला जात असल्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला
गती प्राप्त झालेली आहे.सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगामध्ये ग्रामीण भागातील
गावकरी,तरुण आणि महिला भगिनींना ग्रामविकासामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी करून गावचा
विकास करण्यासाठी आपण सतत ध्यास घेतलेला आहे.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
स्व.यशवंतराव चव्हाण यांचे ग्रामविकासाचे स्वप्न आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि
तुकडोजी महाराज यांचे विचार अंगीकारून आपण गावचे सरपंच,उपसरपंच आणि सदस्य
त्याचबरोबर ग्रामस्थांसोबत सातत्याने गावाची सेवा करणारे ग्रामसेवक,ग्रामविकास
अधिकारी असतात.आबासाहेब खिलारे यांनी उच्च शैक्षणिक पात्रतेचा गावातील प्रत्येक
घटकांसाठी अनेक उपक्रम राबवून प्राप्त ज्ञानाचा सदैव उपयोग केलेला आहे.आपल्या या
उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सरपंच आणि सक्षम ग्रामपंचायतचे ध्येय अंगी बाळगून
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांचेवतीने आज "आदर्श ग्रामसेवक पुरस्कार "प्रदान "
होत आहे.खिलारे यांना आज मिळत असलेल्या पुरस्काराबद्दल ग्रामसेवक संघटना बीड
जिल्हा आणि आष्टी तालुका ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी,सदस्य,ग्रामसेवक
,ग्रामविकास अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या