आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सरपंच
दत्तात्रय खोटे दत्तात्रय दादाराव खोटे यांना सरपंच परिषद मुंबईतर्फे आदर्श सरपंच
पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे आज रविवार दि.३ डिसेंबर रोजी यशदा
पुणे येथे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांंच्या हस्ते वितरण होत आहे.
ग्रामपंचायतला चांगली दिशा मिळण्यासाठी परिषदेच्यावतीने उत्कृष्ट काम करणारे सरपंच,
ग्रामसेवक,अधिकारी,लोकप्रतिनिधींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सांगवी
पाटणचे सरपंच खोटे यांची काम करण्याची पद्धत,गावाचा विकास करण्याची तळमळ यामुळे
त्यांना परिषदेच्या राज्य कार्यकारिणीने आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केला आहे. यशदा
पुणे येथे आज रविवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल अशी माहिती सरपंच
परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.
0 टिप्पण्या