Ticker

6/recent/ticker-posts

श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे यांना " पंडित दीनदयाळ जीवन गौरव पुरस्कार " २०२३ जाहीर

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेद्वारे सन २०२२ या वर्षीपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना " पंडित दीनदयाळ जीवन गौरव पुरस्कार " प्रदान करण्यात येतो.सन २०२३ या वर्षाचा हा जीवनगौरव पुरस्कार आष्टी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक,पूर्व प्रचारक श्रीधर विठ्ठल सहस्त्रबुद्धे यांना जाहीर झाला आहे. आष्टी येथील पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्था ही गेली २५ वर्षापासून सर्वसामान्य नागरिक ग्राहकांच्या जीवनोन्नतीसाठी कार्यरत आहे.ज्येष्ठ विधीज्ज्ञ बाबूराव अनारसे आणि सुनीलसेठ मेहेर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व संचालकांच्या सहकार्याने या संस्थेने सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी, सहकार, सचोटी आणि सातत्य या त्री सूत्रीने उत्तम पद्धतीने काम करत आहे.. त्या उद्देशानुसारच समाजामध्ये सेवाभावी आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो मागील वर्षी सन २०२२ यावर्षीचा पंडित दीनदयाळ जीवनगौरव पुरस्कार कडा येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अशोक गांधी यांना प्रदान करण्यात आला होता.यावर्षीच्या सन २०२३ च्या पुरस्काराविषयी माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष बाबूराव अनारसे म्हणाले की, गेली सहा दशके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये कार्यरत असलेले श्रीधर विठ्ठल सहस्त्रबुद्धे उपाध्य श्रीधर पंत सहस्त्रबुद्धे यांच्या या अलौकिक कार्याची दखल घेऊन संस्थेच्या निवड समितीमध्ये विचारविनिमय होऊन सन २०२३ यावर्षीचा पंडित दीनदयाळ जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रविवार दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी कै.बबनराव देशपांडे सभागृहामध्ये विशेष समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असेही ते शेवटी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या