Ticker

6/recent/ticker-posts

दीपिका बापूराव गिते हिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

आष्टी (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद लातूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पर्धा २०२३ - २०२४ दि.९ ते ११ डिसेंबर २०२३ रोजी उदगीर,लातूर याठिकाणी पार पडली.यामध्ये आष्टी येथील श्री गणेश विद्यालयाचा संघ , दीपिका गिते,वैष्णवी वायकर,वैष्णवी गिते, साक्षी शिंदे,अस्मिता भवर,दिक्षा राख,जयश्री आंधळे,सोनाक्षी गिते,मीनाक्षी गिते,स्वाती गिते यांनी राज्य क्रीडा स्पर्धेसाठी सहभाग घेतला.महाराष्ट्र राज्याच्या अंतिम संघात कु.दीपिका बापूराव गिते हीची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. दीपीका या शैक्षणिक वर्षात होणा-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे.दीपीका हिला संस्थेच्या अध्यक्षा सुमनबाई थेटे,सचिव परमेश्वर काकडे,भाऊसाहेब कोकणे,पोपटराव खाडे,मधुकर वांढरे,रामदास भगत,दत्तात्रय ढोबळे,महेश सावंत,राजकुमार थेटे मुख्याध्यापक रमेशसिंह देसुरकर,पर्यवेक्षक अशोक गाडेकर,क्रीडा शिक्षिका स्वाती चौधरी,उमेश तरटे,पोपटराव घुले,भाऊसाहेब थेटे,संजय थेटे आणि पांगुळगव्हाण ग्रामस्थांनी दीपिका गिते हिचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या