Ticker

6/recent/ticker-posts

रा.से.यो.व कडा प्रा.आ.केंद्राचेवतीने किशोरवयीन मुलींसमोर शारिरीक मानसिक आव्हाने विषयावर कार्यशाळा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कडा येथील श्रीराम मध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने संस्थाध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे,डाॕ. अजयदादा धोंडे यांच्या प्रेरणेने विद्यालयाचे प्राचार्य महादेव दानवे यांचे व उपप्राचार्य संजय धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा.एस.एच.पठाण सर व प्रा.श्रीमती नाईक मॅडम, सांस्कृतिक विभागाच्या प्रा.श्रीमती लांडगे मॅडम यांनी आयोजन केलेल्या किशोरवयीन मुलीसमोरील शारीरिक व मानसिक आव्हाने या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून कडा येथील वै्द्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.प्रियंका सिंघन यांनी किशोरवयात येणाऱ्या समस्या व त्या समस्या कशा प्रकारे सोडवाव्यात यावर सखोल मार्गदर्शन केले.कडा येथील मार्कंडे हॉस्पिटलच्या संचालिका श्रीमती डॉ.मार्कंडे मॅडम व वैद्यकीय अधिकारी खुंटेफल येथील श्रीमती डॉ.घोडके मॅडम यांनी किशोरवयीन मुलींचे आहार व आरोग्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती प्रा.निता झगडे होत्या.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीमती प्रा.हेमाली बोडखे मॅडम, प्रा.भवर सर,प्रा.ढवळे सर व सर्व प्राध्यापकांनी परीश्रम घेतले.
प्रा.श्रीमती झांजे मॅडम यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या