उत्तमराव बोडखे,आष्टी
-------------------




शेतीनिष्ठ शेतकऱ्यांसाठी राज्यपातळीवरील कृषी प्रदर्शनाचे आयोजन आष्टी तालुक्यात पहिल्यांदाच करण्याचा योग आला आहे.माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पर्वणी असणार आहेच.कृषी प्रगतीला महामंत्र देणारे प्रदर्शन म्हणूनही या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाकडे पाहीले जात आहे.या प्रदर्शनासाठी राज्यातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांंच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी,शेतीनिष्ठ शेतकरी उपस्थिती लावणार आहेत.दिड टन वजनाचा रेडा या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पाहण्यासाठी मिळणार आहे.स्पर्धेच्या युगाला सामोरे जाताना नवनवीन कृषी तंत्रज्ञान, अत्याधुनिक कृषी अवजारे,कृषीविषयक सर्वंकष माहिती याचबरोबरच कृषी पतपुरवठा,
बँक,टु-व्हिलर,ट्रॅक्टर,चारचाकी वाहने, गृहपयोगी वस्तू,उत्पादने व खाद्यपदार्थाची लयलूट अनुभवण्यासाठी आपणाला आमंत्रित करण्यात येत आहे.
आष्टीत प्रथमच होणाऱ्या डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२४ डिसेंबर २०२३ सकाळी ११ वा.होत आहे.हे प्रदर्शन दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ चार दिवसांच्या कालावधीत आहे.आष्टी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर नगर-बीड रोड,आष्टी येथे भव्य दिव्य मैदानावर होत आहे.स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे आहेत.उद्घाटक पालकमंत्री तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे,भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे,महाराष्ट्र राज्य कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल आहेत तर प्रमुख उपस्थिती खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु इंद्र मणी,आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,माजी मंत्री आ.सुरेश धस,माजी मंत्री आ.प्रा.
राम शिंदे,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर,जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे,ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर,
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,कडा कृ,उ.बा.समितीचे सभापती रमजान तांबोळी,कडा कृ.उ.बा.समितीचे उपसभापती नामदेव धोंडे,पाटोदा कृ.उ.बा.समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,भाजप तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के (आष्टी), रामराव खेडकर,रामदास बडे,कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबासाहेब पिसोरे,कृषीभुषण दत्तात्रय ढोबळे,
विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर डाॕ.तुकाराम मोटे,जिल्हा कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजुरकर,
उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,डीवायएसपी अभिजीत धाराशिवकर,उपविभागीय कृषी अधिकारी उध्दव गर्जे,तहसिलदार प्रमोद गायकवाड,आष्टीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे (आष्टी),कृषी अधिकारी नाथराव शिंदे (पाटोदा),तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके (शिरूर का.),बीड जिल्हा व्यापारी असो जिल्हाध्यक्ष संजयशेठ मेहेर,सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.या प्रदर्शनात कृषी अवजारे व मशिनरी कृषि बँकिंग,कृषि योजना,कृषी प्रक्रिया उद्योग,कृषी विषयक पुस्तके,प्रकाशने,
ठिबक व तुषार सिंचन,महिला बचत गट स्टॉल,आधुनिक किटकनाशके,शोभीवंत झाडांची रोपवाटिका,रासायनिक व सेंद्रिय खते,कृषीविषयक चर्चासत्रे,डेअरी फुडस् उद्योग,ट्रॅक्टर्स व वाहन उद्योग,
पशुसंवर्धन,पशुखाद्य,नवनवीन बि-बियाणे,गृहपयोगी वस्तू उत्पादक व विक्रेते,स्प्रे पंपापासून ट्रॅक्टरपर्यंत,बि-बियाण्यांपासून कृषि प्रक्रियेपर्यंत,टु-व्हिलरपासून ते फोर व्हिलरपर्यंत गृहपयोगी वस्तू व उत्पादने,महिला बचत गटाच्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ असे १५० पेक्षा जास्त नाविन्यपूर्ण स्टॉल्स असलेलं प्रदर्शन आहे.
---------
'
0 टिप्पण्या