Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना मिळणार एकाच छताखाली अनेक प्रश्नाचे उत्तर; चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्या --- सरपंच सावता ससाणे

आष्टी (प्रतिनिधी) शिक्षण महर्षि तथा रस्ते सम्राट आष्टीचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतुन आष्टीत प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. आष्टी येथे होणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ..न भुतो न भविष्यती..होत आहे.हे कृषी प्रदर्शन चार दिवशीय कृषी प्रदर्शनातुन शेतकऱ्यांना एकाच छताखाली अनेक प्रश्नाचे उत्तर मिळणार असून या कृषी प्रदर्शनाचा लाभ आष्टी तालुक्यातील तसेच कडा व लोणी गटातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गटाचे नेते तथा सरपंच सावता ससाणे यांनी केले आहे. माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतुन,आष्टी येथील छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्यावतीने दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीतील चार दिवसीय डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.या कृषी प्रदर्शनाचे आज रविवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे,भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे,यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी,पद्मभूषण पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात लोणी व कडा गटातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन गटाचे नेते तथा टाकळी अमियाचे सरपंच सावता ससाणे यांनी केले आहे.या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण दोन कोटी किमंतीचा दीड टन वजनाचा रेडा असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या