Ticker

6/recent/ticker-posts

कडा शहरात संत मदन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.बबन महाराज यांची सुश्राव्य रामकथा होणार...

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथे वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या २७ व्या. पुण्यतिथीनिमित्त कडा येथील संत मदन महाराज संस्थान आवारात संतनगरात दि.२५ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी दिली. वै.संत मदन महाराज संस्थान येथे दि.२५ डिसेंबर रोजी सप्ताहास प्रारंभ तर दि. १ जानेवारी २०२४ रोजी सांगता होणार आहे.सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गुरुवर्य वै.संत मदन महाराज यांच्या शहरातील मठापासून भव्य शोभा यात्रा निघणार आहे.या संपूर्ण सप्ताह कालावधीत आठ दिवस काकडा भजन, पसायदान,गाथाभजन,ज्ञानेश्वरी पारायण,रामकथा हरिपाठ,हरिकीर्तन,हरिजागर आदीसह विविध अध्यात्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल होणार आहे.या सप्ताहात दररोज ३ ते ६ या वेळात ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांची सुश्राव्य रामकथा होणार आहे.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर,गणेश महाराज हुंबाड, एकनाथ महाराज चतर,रामभाऊ महाराज राऊत,योगीराज महाराज गोसावी,
वाणीभुषण उमेश महाराज दशरथे,मुकुंद महाराज जाटदेवळेकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. सोमवार दि.१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १२ यावेळात संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.कीर्तनानंतर सामुदायिक विवाह सोहळा व महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी दैनंदिन होणाऱ्या विविध पवित्र आध्यात्मिक सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत लाभ घ्यावा असे आवाहन संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या