
आष्टी (प्रतिनिधी)
शांत चित्ताने आणि आनंदी
वृत्तीने काम केल्यास यश मिळत असे म्हणतात.जो सातत्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून
प्रचंड मेहनत कष्ट घेतो दुःख त्याच्या वाट्याला कधीच अपयश येत नाही किंबहुना
सर्वसामान्यांच्या भल्यासाठी अहोरात्र विविध योजना आणून विकासाची वाटचाल करतो तो
खऱ्या अर्थाने समाजसेवक ठरतो.राजकारणात राहूनही समाजकारणाचे अधिक वेड लावून घेत
हजारो सर्वसामान्यांसाठी दीपस्तंभ ठरलेले काहीजण असतात.त्यात आष्टी,पाटोदा,शिरूर
विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या नावाला
अधिक महत्त्व दिले जाते.निर्मिती शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार
असतात.अंगभूत कलागुणांची क्षमता सिद्ध करून शब्दांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची
दुःख वेदनांना वाट मोकळी करून न्याय मिळवण्यासाठी धडपडणारे आणि गेल्या ३५ वर्ष
आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्याचे लेखणीतून प्रतिनिधित्व करणारे जेष्ठ पत्रकार उत्तम
बोडखे यांचाही विशेष उल्लेख यावेळी केला गेला.माजी आमदार भीमराव धोंडे आणि पत्रकार
उत्तम बोडखे आष्टीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनानिमित्त येथे एका कार्यक्रमाच्या
निमित्ताने पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि त्यातील कलावंतांच्या अत्यंत
बारकाईने त्यांच्या कला कौशल्य आणि कलागुणांनांवर कौतुकाची थाप टाकत त्यांना
शाब्बासकी देताना मंचासमोर अत्यंत धीर गंभीरतेणे एकत्र बसल्याचे जेव्हा दिसले
तेव्हा उपस्थितांपैकी अनेक जणांनी त्यांच्या संवेदनशील आणि व्यापक दृष्टीकोणाचा
कौतुकाने उल्लेख केला.किंबहुना हे दृश्य फोटोग्राफरने त्याच्या कॅमेऱ्यात टिपले आणि
समाज माध्यमात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.यावेळी असंख्य शेतकरी बांधवांसह
कृषिप्रेमी तसेच युवक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहारदार सुत्रसंचलन
प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ,प्रा.आदिनाथ शिवरकर यांनी तर उपस्थितांचे प्राचार्य
डाॕ.डी.बी.राऊत यांनी आभार मानले.
------------------------
0 टिप्पण्या