
आष्टी (प्रतिनिधी)
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्यावतीने देण्यात येणारा पहिला उत्कृष्ट उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दलचा युवा उद्योजक पुरस्कार बाबुभैय्या गर्जे यांना नुकताच जाहीर करण्यात आल्याची माहिती सरपंच परिषदेच्यावतीने देण्यात आले आहे.सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,बाबुभैय्या सुधाकर गर्जे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून उद्योग क्षेत्रामध्ये घेतलेली भरारी प्रशासनीय आहे.त्यांनी स्वतःच्या शेतात उद्योग स्थापन करून राज्य देश आणि प्रदेशातही या उत्पादनाने विक्रीची किमया केली आहे.ही बाब महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण सर्वसामान्य युवकांसाठी प्रेरणेची बाब आहे.त्याची दखल घेत महाराष्ट्र सरपंच परिषद यांच्या वतीने त्यांना यंदाचा युवा उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषदेचे कार्य राज्यभर गतिमान आहे.हा पुरस्कार ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता यशोदा पुणे येथे मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच परिषदेचे मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली आहे.दरम्यान युवा उद्योजक बाबुभैय्या गर्जे यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे उद्योग क्षेत्रासह सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या