Ticker

6/recent/ticker-posts

आपली नैतिक जबाबदारी म्हणून एड्स विषयीच्या जनजागृतीमध्ये खारीचा वाटा उचलावा -------प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ

आष्टी (प्रतिनिधी) एड्स जनजागृती विषयी विविध स्तरावरून अनेक कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये शैक्षणिक विभाग ही मागे नाही.बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये एड्स विषयीचा एक चाप्टर समाविष्ट करण्यात आलेला आहे.आपण सर्वांनीही नैतिक जबाबदारी म्हणून एड्स विषयीच्या जनजागृतीमध्ये खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांनी केले. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून येथील भगवान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१ डिसेंबर
रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक समस्या बनलेल्या एड्स या महाभयंकर आजाराच्या जनजागृतीसाठी ग्रामीण रुग्णालय ते महाविद्यालयापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी एड्स जनजागृती चे स्लोगन लिहिलेले फलक हातामध्ये घेऊन व घोषणा देत बहुसंख्य विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शास्त्रीय माहिती दिली.ते म्हणाले की,आजच्या बदलत्या काळामध्ये एड्सविषयी जनजागृती करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आरोग्य विभागाची यासंदर्भात यावर्षीची 'कम्युनिटी लीड'(समाजाचा पुढाकार) अशी थीम आहे. यानुसार आपण आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.यामध्ये प्रत्येक व्यक्तीने मनाचा ब्रेक उत्तम ठेवला पाहिजे.एड्सवर अनेक औषधे उपलब्ध झालेली आहेत त्याद्वारे आपण रुग्णाचे आयुष्यमान वाढवू शकतो.दिवसेंदिवस विविध वायरस येऊ लागले आहेतयाविषयी आपण सजग असणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील एड्स जनजागृती कार्यक्रमाचे समुपदेशक सुनील सरवदे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करताना असे सांगितले की, समाजामध्ये वावरत असताना एड्सग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.अशा सामाजिक उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग कायम अग्रेसर असतो असे ते म्हणाले. यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर अशोक देवकर व ह.भ.प.दिनकर तांदळे महाराज ही आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बाळासाहेब गावडे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.आप्पासाहेब टाळके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.अशोक देवकर,डाॅ. सूर्यकांत धोंडे,डाॅ.बाळासाहेब गावडे यांना उपप्राचार्य डाॅ.ज्ञानदेव वैद्य,डाॅ.आप्पासाहेब टाळके,डाॅ.बाबासाहेब झिने,डाॅ.आबासाहेब पोकळे,डॉ.नामदेव वाघुले,डॉ.दीपक टेकाडे,डॉ.दिलीप जरे,डॉ.अनिल हजारे व प्रा.नंदकिशोर धोंडे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या