Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच परिषदेचे मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर ------------------------ ग्रामशिलेदारांचा व प्रशासकीय कर्तुत्वाचा होणार गौरव ---------------- रविवारी यशदा पुणे येथे वितरण

आष्टी (प्रतिनिधी) सन्मानित सरपंच आणि विकसनशील गाव यासाठी कार्यरत असणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.रविवार दि.३ डिसेंबर रोजी पुणे येथे राज्याचे ग्राविकास मंत्री गिरीश महाजन,खा.डॉ.श्रीकांत शिंदे,ग्राविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,पद्दमश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. *पुरस्कारांचे मानकरी* -------------------- ग्रामीण भागात अत्यंत चांगले कामकरणारे लोकप्रतिनिधी आ.बच्चूभाऊ कडू,आ. अभिमन्यू पवार,आ. सुनील शेळके,आ.कृष्णा गजबे,आ.सुमनताई आर. पाटील या लोकप्रतिनिधींना तर उत्कृष्ट काम केलेले मृद व जलसंधारणचे सचिव सुनील चव्हाण,भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, राज्याचे शिक्षण सचिव शैलेंद्र देवळकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे,सतीश बुद्धे यासह सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पद्मश्री लीला पूनावाला यांचा समावेश आहे.यासह आदर्श सरपंच म्हणून राजश्री मनोहर भोसीकर (नांदेड),दत्तात्रय खोटे (बीड),ज्योती हेमराज पाटील (जळगांव),चंद्रकांत साहेबराव पाटील (चाळीसगाव), पांडुरंग शंकर तोरगले (कोल्हापूर),जिजाभाऊ टेमगिरे (आंबेगाव),निकिता चंद्रशेखर रानवडे (मुळशी पुणे),विजय मुरलीधर शेवाळे (अहमदनगर(,सुनिता बाळू तायडे (रावेर),सदानंद मंडोपंत नवले (नाशिक) यांचा समावेश आहे तर आदर्श ग्रामसेवक म्हणून आबासाहेब दिलीपराव खिलारे बीड,विजयसिंह विलासराव नलावडे (धाराशिव),कमल तिडके-तावडे (नांदेड),आदर्श शिक्षक म्हणून सोमनाथ भंडारे (वडू बुद्रुक ता.शिरूर),उत्तम महादेव कोकितकर (आजरा कोल्हापूर),किशोर चंद्रकांत नरवाडे (नांदेड),शहाजी महावीर जाधव (लोहारा) तर युवा उद्योजक म्हणून बाबूभैय्या उर्फ बाबासाहेब सुधाकर गर्जे (बीड),सामाजिक मधून एकनाथ विठ्ठल गाडे (जांभूळ सांगवी) तर आदर्श ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांचा समावेश आहे. *चौकट* ----------- प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.विकास जाधव,प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस,आनंद जाधव,किसान जाधव,राणीताई पाटील,शिवाजी आप्पा मोरे,आश्विनीताई थोरात,सुप्रिया जेधे,सुधीर पठाडे,नारायण वनवे,कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे आदि नावे आहेत. ********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या