
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील
कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय
आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डाॕ.हरिदास
विधाते यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या १२ वर्षांपासून कडा येथील
आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयात कैआनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी यांचे स्मृती
प्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
स्पर्धेचे हे १३ वे वर्षं आहे.स्पर्धेसाठी सत्तेचे राजकारण आणि भारतीय लोकशाही व
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. विजेत्या
स्पर्धकांना सांघिक प्रथम पारितोषिक आनंदराव धोंडे फिरता करंडक व प्रमाणपत्र तसेच
प्रथम क्रमांकासाठी रु.७०००,द्वितीय क्रमांक रु.५०००,तृतीय क्रमांक रु.३०००
तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत,प्रत्येकी एक हजार रुपयांची असुन
सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.ही स्पर्धा
महाराष्ट्रातील सर्व कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली
राहील.महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या एका संघाला स्पर्धेत सहभागी होता
येईल.प्रत्येक स्पर्धकांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र असने बंधनकारक आहे.संघाने
प्राचार्यांचे संमतीपत्र संयोजकाकडे देणे गरजेचे आहे.प्रत्येक संघास १०० रू.
प्रवेश फी राहिल.स्पर्धकांची निवास व भोजन व्यवस्था केली जाईल.या स्पर्धा गुरुवार
दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ आहेत.अधिक माहितीसाठी संयोजक व उपप्राचार्य
डॉ.बापु खैरे,प्रा.मोहम्मद पटेल,प्रा.डॉ.गोपीनाथ बोडखे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या