Ticker

6/recent/ticker-posts

२४ ते २७ डिसेंबर या कालावधीतील ऐतिहासिक कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ----- -शंकर देशमुख

आष्टी (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतुन आष्टी,पाटोदा,शिरुर मतदार संघात प्रथमच होत असलेल्या कृषी प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांनी भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा भाजप सरचिटणीस शंकर देशमुख यांनी केले आहे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतुन,आष्टी येथील छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्यावतीने दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीतील चार दिवसीय डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषीमंत्री धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे,कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी,पद्मभूषण पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.आज या राज्यस्तरीत कृषी प्रदर्शनाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सहभाग लाभावा यासाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंनी,प्राध्यापक,शेतकरी,सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन शंकर देशमुख यांनी केले.यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की,आष्टी येथे होणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन न भुतो न भविष्यती होत आहे.हे कृषी प्रदर्शन चार दिवस आहे.कृषीविषयक प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहे.शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणारा हा आष्टी तालुका आहे.या तालुक्यात कृषी प्रदर्शन घेण्याचे योग आपल्याला आला आहे.आष्टी शहरात दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ चार दिवस राज्यस्तरीय डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे पहिल्यांदाच होत आहे.या कृषी प्रदर्शनामध्ये छञपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील उभारलेले उद्योग व त्यांचा अनुभवकथन करण्यासाठी उभारण्यात येणारी यशस्वी विद्यार्थी व्यावसायिकांची दालने या प्रदर्शनीचे आकर्षण ठरणार आहे.या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण दोन कोटी किमंतीचा दीड टन वजनाचा रेडा असणार आहे.या प्रदर्शनात डेअरी तंत्रज्ञान,कृषी तंत्रज्ञान, सोलर शासकीय योजना,शेती अवजारे,बी-बियाणे,कुक्कुटपालन खते,सिंचन, पतपुरवठा,हरितगृह, खाऊ गल्ली,लहाण मुलांसाठी खेळ गल्ली यासह विविध कृषी पिकासंदर्भात तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. ----------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या