Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे नामांकीत वकील माणिकराव लगड पाटील यांचे निधन

आष्टीचे नामांकीत वकील माणिकराव लगड पाटील यांचे निधन आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील मुळचे हिवरा पिंपरखेड येथील नामांकीत वकील माणिकराव भानुदास लगड पाटील (वय ८७) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.अहमदनगर शहराचे माजी खासदार कै.चंद्रभान आठरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.माणिकराव लगड यांनी वकीली व्यवसाय सुरू केला होता. वकिली व्यवसायामध्ये येण्यापूर्वी रयत शिक्षण संस्था अहमदनगर आणि जिल्हा शिक्षण संस्था संचलित करंजी येथील शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काही वर्ष त्यांनी सेवा केली.त्यांनी काही काळ तहसील कार्यालयामध्ये सेवा केली.तत्कालीन काळात डॉक्टर,वकील, प्राध्यापक यांना प्रतिष्ठा असल्याने त्यांनी वकीली क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.सन १९७८ ते १९९० या कालावधीमध्ये लगड मामा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले.आष्टी तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क,मोठ्या प्रमाणात नातेवाईक,मित्रपरिवार असल्याने ते आष्टी तालुक्यामध्ये जास्त वेळ सामाजिक व राजकीय कार्य करीत राहिले.त्यांनी नेहमी राजकारणाकडे समाजकारण म्हणून पाहिले आहे.त्यांचा मूळ स्वभाव राजकारणाचा नव्हताच.राजकारण करताना त्यांनी शरदचंद्र पवार यांना आदर्श मानले होते.अखेरपर्यंत ते शरदचंद्र पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून राहिले.ॲड.लगड मामा हे जास्त काळ राजकारणात रमले नाहीत.त्यांनी नेहमी सन्मानपूर्वक जीवन जगण्यात आनंद मानला. माजी आमदार ॲड.निवृत्तीराव उगले, ॲड.चंद्रकांतभाऊ आजबे,कै.रामचंद्रदादा धस,स्वतंत्र सैनिक साहेबरावदादा थोरवे,माजी आ.साहेबराव दरेकर यांचे सहकारी म्हणून काम केले.तर बीड जिल्ह्यात शिवाजीराव पंडित,बाबुराव आडसकर,मोहनराव सोळुंके यांच्या समवेत राजकारणात सक्रिय काम केले. आष्टी शहरामध्ये कै.ॲड.बी.डी. हंबर्डे,ॲड.
शिवाजीराव शिंदे,ॲड.हरिश्चंद्र शेकडे, डॉ.रघुनाथ शिंदे,डॉ.मधुकर हंबर्डे,सेवानिवृत्त प्राचार्य के.बी.चवरे,प्रा.देविदास चाळक,कै.त्र्यंबकराव मुटकुळे यांच्यासह संभाजीनगरचे प्रसिद्ध उद्योगपती मधुकरअण्णा मुळे,पद्माकर मुळे,दिनकरराव मुळे,बाबासाहेब खिळे पाटील,ॲड.दादासाहेब कोल्हे,बीडचे ॲड.औटी हा त्यांचा मित्र परिवार होता.ॲड.माणिकराव लगड मामा यांच्या पाठीमागे कौशल्याबाई लगड ही पत्नी, एकनाथ लगड हा भाऊ,दिलीप लगड,शिरीष लगड,सतीश लगड हे तीन मुले तर सौ.सुनीता गंगाधर ढोले ही मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.आष्टी तालुक्यातील हिवरा पिंपरखेड येथे रविवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता दशक्रियाविधी होणार आहे. या दशक्रियाविधीनिमित्त भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांचे प्रवचन होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या