


उत्तम बोडखे,आष्टी
---------------
जीवन हे सुंदर आहे परंतु हे जगत असताना अध्यात्माचा सुगंध सोबती असावा लागतो.सत्य,सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून मनुष्य आनंदी जीवन जगू शकतो असे सांगत मनुष्याने संसारी जरूर असावे पण त्याहीपेक्षा संस्कारी अधिक असले पाहिजे असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कासेवाडी येथे आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा आष्टी दुध संघाचे माजी चेअरमन आदिनाथसानप यांच्या माता पित्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये ते कीर्तन सेवा देताना बोलत होते.यावेळी महाराज संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी विविध दृष्टांत देत उपस्थित भाविक भक्तांना खेळवून ठेवले.यावेळी महंत आजिनाथ शास्री तारकेश्वरगडकर,माजी आ.साहेबराव दरेकर,देविदास धस, युवानेते जयदत्त धस,समाजसेवक विजय गोल्हार,
ह.भ.प.परमेश्वर शास्री,राजेंद्र धोंडे, बबनआण्णा झांबरे,सुखलाल मुथा,
डाॕ.शिवाजी राऊत,अमर निंबाळकर,
भाऊसाहेब लटपटे,सभापती बद्रीनाथ जगताप,आण्णासाहेब चौधरी,ॲड.
हनुमंत थोरवे,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,
नामदेव राऊत,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,
विक्रम पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी संत महंतांच्या आणि चेअरमन आदिनाथ सानप यांच्या माता पित्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ह.भ.प.
संजय महाराज पाचपोर पुढे म्हणाले की,संत महतांनी मानवी जीवनाला फार मोठा भक्तीचा महिमा दिला आहे त्यांनी सांगितलेल्या विचार आणि कार्यावर चालल्यास मनुष्याची फार मोठी यश प्राप्ती होऊ शकेल.सद्यस्थितीवर भाष्य करताना महाराजांनी अनेक दृष्टांत दिली गरीबांची झोप श्रीमंत असते तर श्रीमंतांची झोप गरीबी असते असे सांगत त्यांनी आजही श्रीमंत घरची मुले आई वडिलांना सांभाळ करायला तयार नाहीत,सेवा करीत नाहीत हे वास्तव अधोरेखित करून मनुष्याने संसारी जरूर असावे पण त्याहीपेक्षा संस्काराची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. उपस्थित रसिक प्रेक्षक आणि भाविक भक्तांनी त्यांच्या वास्तवावरील केलेल्या वाणीला प्रतिसाद दिला. समाजातील आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असलेल्या व्यक्तींनी आपल्या घराची दरवाजे सतत उघडी ठेवली पाहिजेत या दरवाजातून गोरगरी व गरजू समाजातील व्यक्तींना सढळ हाताने मदत करावी अशी वृत्ती ठेवली पाहिजे.
यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, समाजसेवक विजय गोल्हार ,देविदास धस,राजेंद्र धोंडे, जयदत् धस,अण्णासाहेब चौधरी डॉ.शिवाजी राऊत भाऊसाहेब लटपटे,बबनराव झांबरे, दिनकर महाराज तांदळे, बलभीम सुंबरे,डॉ.मधुकर हंबर्डे,ॲड.हनुमंत थोरवे आदी उपस्थित होते.
आपल्या कीर्तन सेवेमध्ये बोलताना संजय महाराज म्हणाले की,समाजातील व्यक्तींनी अध्यात्म अथवा परमार्थ नाही केला तरी चालेल परंतु समाजामध्ये राहत असल्यामुळे समाजाला गरज लागेल त्यावेळी समाजासाठी उपयोगी पडण्याची गरज असते समाजावरहीत व्यक्तीला काहीच किंमत नसते.गरजू व्यक्तींना मदत करणे ही सर्वात मोठी नैतिकता असून श्रीमंत माणसांनी आपल्याकडील पैशाचा उपयोग गरजू आणि दीनदुबळ्या लोकांसाठी मदतीसाठी केला पाहिजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये संस्कृती रक्षणाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली असून हिंदू धर्मातील नागरिकांनी आपल्या उत्पन्नातील किमान १० टक्के रक्कम ही देश देव आणि धर्म यासाठी समाजाला दान केली पाहिजे.हे दान देखील कर्तव्य म्हणून केले पाहिजे केवळ नावासाठी दानधर्म करू नये असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की,समाजातील कीर्तनकार प्रबोधनकार राजकीय नेते आणि वैद्यकीय व्यावसायिक यांनी कधीही खोटे बोलू नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असते.
प्रयत्न करूनही होत असेल तर ते प्रारब्धाने होत असते.कोणाचं कसं प्रारब्ध असेल ते सांगता येत नाही.
ज्या घरी आदर नाही, प्रेम नाही, त्या घरी कोणीच जाऊ नये.आदिनाथ सानप यांनी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांची चांगली सेवा केलेली आहे.त्यामुळेच आज या ठिकाणी समाजातील सर्व घटकातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत आदिनाथ सानप यांच्या कार्याची पावती आहे असेच त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले लाभा शिवाय प्रेम करणारी ती असते माय,आई वडिलांची सेवा करा तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कोणत्याही देवाला तीर्थ क्षेत्राला जायची गरज नाही.आईने आपल्या लहानपणी ताटा समोरची घाण सहन केली होती तर तुम्ही देखील म्हातारपणी आई वडिलांची सेवा करताना देखील सहन करावी त्यांचा म्हातारपणी कंटाळा करू नका. असे सांगत अत्यंत प्रभावीपणे कीर्तन सेवेचा समारोप केला यावेळी श्रद्धांजली वाहताना ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले,आदिनाथ सानप यांच्या आई वडिलांच्या आत्म्याला आज आनंद झाला आहे.आज समुदाय जमला आहे दानशूर पुत्र अजिनाथ सानप हे प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी झाले. देवाच्या सेवा केल्याची ताकद आई वडिलांची सेवाही केल्या प्रमाणे आहे.
यावेळी बोलताना देविदास धस म्हणाले की,या पुण्यस्मरण कार्यक्रमातुन असं वाटतं की आमचे श्राद्ध देखील असेच व्हावे.माता पित्यासारखं श्रेष्ट कोणीच नाही असा सोहळा सानप यांनी केला आहे.शेतकरी वर्गच असा आहे की जो आई वडिलांना सांभाळतो आहे.त्यांची मुले देखील त्यांची सेवा चांगली करतील ते सहकार क्षेत्रात एक नंबर असलेला माणूस राजकीय क्षेत्रात सर्व आमदार आणि प्रत्येक घटकांची संपर्क असलेले चेअरमन सानप सर्व पक्षाशी संबंध असलेलं हे व्यक्तिमत्त्व आहे.या एका छोट्या वाडीतून येत त्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित केले असे म्हणाले.
यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की,आई वडिलांना कसं जपलं पाहिजे ? याचा आदर्श आदिनाथ सानप यांनी केलेली सेवा ही आहे आदिनाथ सानप हे एक संयमी व्यक्तिमत्त्व आहे.आई वडिलांची सेवा केली ती माणस या जगात मोठे झाले आहेत.संतासारखं त्याग आत्ताच्या पिढीत राहिला नाही.गाडगेबाबा नेहमीच म्हणायचे दगडगोट्याचा देवाची सेवा करण्यापेक्षा कामावर लक्ष देऊ नक्कीच प्रगती होईल.त्याप्रमाणे समाजातील नागरिकांनी याचा विचार केजाहिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी बोलताना समाजसेवक विजय गोल्हार यांनी अविनाश सानप यांचे काशेवाडी गाव हे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडेसाहेबांना मानणारे आहे.त्यामुळे येथील नागरिक हे अत्यंत दानशूर आहेत असे सांगितले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, राजेंद्र धोंडे ,दिनकर महाराज तांदळे ,अण्णासाहेब चौधरी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी ह.भ.प.परमेश्वर शास्री,राजेंद्र धोंडे,बबन झांबरे,सुखलाल मुथा,डाॕ.शिवाजी राऊत,अमर निंबाळकर,भाऊसाहेब लटपटे,सभापती बद्रीनाथ जगताप,आण्णासाहेब चौधरी,
ॲड.हनुमंत थोरवे,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,नामदेव राऊत,प्रफुल्ल
सहस्त्रबुद्धे,विक्रम पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे,सचिन रानडे ,प्रवीण पोकळे,
संतोष सानप,डाॕ.मधुकर हंबर्डे,एन.टी.
गर्जे,अशोक गर्जे,शिवाजी नाकाडे,
कल्याण पोकळे,दगडुशेठ गोल्हार,
सेवानिवृत्त नायब तहसिलदार शहादेव गिते,अंकुश धस,विष्णूपंत वायभासे,
बलभीम सुंबरे,संजयशेठ मेहेर,
बाळासाहेब शिंदे,रघुनाथ शिंदे,रविंद्र तवले,हौसराव आजबे,माजी सरपंच राम सानप,चेअरमन बन्सीभाऊ पोकळे,
तुकाराम भोसले,ओम महाराज नन्नवरे,बाळकृष्ण राऊत,सोपान पवार,सुनिलशेठ मेहेर आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकार सचिन रानडे ,
प्रवीण पोकळे,डाॕ.मधुकर हंबर्डे,
एन.टी.गर्जे,अशोक गर्जे,शिवाजी नाकाडे,कल्याण पोकळे,दगडुशेठ गोल्हार (उद्योगपती पुणे),सेवानिवृत्त नायब तहसिलदार शहादेव गिते,अंकुश धस,विष्णूपंत वायभासे,बलभीम सुंबरे ,संजयशेठ मेहेर,बाळासाहेब शिंदे,
रघुनाथ शिंदे,रविंद्र तवले,हौसराव आजबे, माजी सरपंच राम सानप,
चेअरमन बन्सीभाऊ पोकळे,
तुकाराम भोसले,ओम महाराज नन्नवरे,बाळकृष्ण राऊत,सोपान पवार,
सुनिलशेठ मेहेर,अंबादास गवारे,
रघुनाथ आवारे,सुभाष गिते सर,डाॕ.बबन शेकडे,सुनिल कारंजकर आधी सह नातेवाईक विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------
मान्यवरांची श्रद्धांजली
---------------------------------
यावेळी महंत आदिनाथ शास्री तारकेश्वरगडकर,आण्णासाहेब चौधरी,समाजसेवक विजय गोल्हार,दिनकरराव तांदळे ,राजेंद्र धोंडे,देविदास धस,माजी आ.
साहेबराव दरेकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या