Ticker

6/recent/ticker-posts

इंजि.बाळासाहेब भुकन यांची बिल्डर्स असो.आॕफ इंडियाचे बीड सेंटरच्या खजिनदारपदी निवड

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील मुळ टाकळी अमिया येथील रहिवासी सध्या पुणे येथे स्थाईक असलेले इंजि.बाळासाहेब किसनराव भुकन यांची नुकतीच बिल्डर्स असो. आॕफ इंडियाचे खजिनदारपदी निवड झाली आहे.गेली २० वर्षापासुन पुणेअहमदनगर,पुणे बीड या जिल्ह्यात बिल्डर क्षेत्रात भरीव आणि नावलौकिक मिळविणारे काम केलेले आहे.आष्टी शहरातील पंचायत समिती कार्यालायाची भव्य ईमारत,महात्मा फुलेवाडा,गंजपेठ पुणे,चौंडी येथील अहिल्यादेवींचे स्मारक,सावरगांव घाट येथील भगवानबाबा स्मारक,इंदापूर येथे विविध कामे व योगाभवन आदि कामे केलेली आहेत.या त्यांच्या कार्याची दखल बिल्डर्स असो.आॕफ इंडिया या संघटनेने घेतली आहे.बीड जिल्ह्यात बीएआयचे नवीन सेंटर सुरू करण्यात आले आहे.या संघटनेचे अध्यक्षपदी रमेश ढाकणे, उपाध्यक्षपदी बाप्पासाहेब घाटुल,सेक्रेटरी शाम क्षीरसागर तर खजिनदारपदी इंजि.बाळासाहेब भुकन यांची बिन विरोध निवड झालेली आहे.यावेळी बिल्डर्स असो.आॕफ इंडिया (वेस्ट झोन)
मेंबरशीप डेव्हलमेंट कमिटीचे व्हाईस चेअरमन इंजि.महेश गुंदेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.इंजि.बाळासाहेब भुकन यांंच्या या निवडीबद्दल माजी आ.भीमराव धोंडे,डाॕ. अजयदादा धोंडे,सरपंच सावता ससाणे, पत्रकार उत्तम बोडखे,इंजि.अविनाश गिरी,प्रशांत ढोबे,बाबा डोके (जामखेड), भाऊसाहेब भवर (पाटोदा) यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या