
आष्टी (प्रतिनिधी)
समाज माध्यमाद्वारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस ठेवू नयेत. यासाठी समाजातील समंजस नागरिकांनी काळजी घ्यावी.समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवू नका तसेच अल्पवयीन मुलांकडे मोबाईल देऊ नका असे आवाहन आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी केले.
आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समिती सदस्यांच्या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.धाराशिवकर पुढे म्हणाले की,गेल्या काही दिवसांमध्ये
समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस ठेवल्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण झाली होती.समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.पोलीस विभागातर्फे सामाजिक शांतता राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. अशा प्रकारचे विघ्नसंतोषी आणि विघातक कृत्य करणाऱ्यांवर शासनाचा "आय बी " सेल हा लक्ष ठेवून असून त्याद्वारे अशा प्रकारच्या उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यात येत असते.दोन समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवल्यामुळे जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये अल्पवयीन मुले असल्याचे आढळून आले ही बाब अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या दाखल गुन्ह्यांमुळे या मुलांचे भवितव्य अंध:कारमय होऊ शकते त्यामुळे पालकांनी विशेषतः आईने आपल्या अल्पवयीन मुलांकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता असून त्यांच्या मोबाईल वरून ते काय करत आहेत हे पाहण्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे.
आम्ही पोलिस अधिकारी कायमस्वरूपी एका ठिकाणी नसतो तुम्हाला मात्र समाजामध्ये याच ठिकाणी राहायचे असल्यामुळे दोन समाजातील निर्माण होणारी तेढ ही तुमच्यासाठी घातक ठरू शकते.त्यामुळे सर्व समाजातील सर्व समंजस नागरिकांनी आपल्या मुलांवर युवकांवर चांगले संस्कार करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही आवाहन धाराशिवकर यांनी शेवटी केले.सुरूवातीस प्रास्ताविक करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी या बैठकीची पार्श्वभूमी विषद केली.
या शांतता समिती बैठकीस सुनिल रेडेकर, सादिक कुरेशी,पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,अंकुश खोटे,खंडुदादा जाधव,डाॕ.नदीम शेख,
अशोक पोकळे,
भाऊसाहेब घुले,जालींदर वांढरे,निलेश गोसावी,कृष्णा पवार,
प्रवीण जाधवर,अलिशेर कुरेशी,हुसेन कुरेशी, शेख रशीद,अशोक निकाळजे,बिबीशन पोकळे,विनोद पोकळे,आनंत देवा जोशी आदि युवक,नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या