
आष्टी (प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट ग्रामीण भागातील गाव असले तरी येथील लोक कष्टाळू,जिद्दी,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षण घेऊन पुढे जातात याचा अधिक अभिमान असून शेतकऱ्यांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षणाची गरज आहे.शिक्षण हेच खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जीवनाचा पाया आहे असे उद्गार शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी काढले.
आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर माध्यमिकव उच्च माध्यमिक विद्यालायाचे इंग्रजी विषयाचे गुणवंत शिक्षक ह.भ.प.बबन मगर सर यांच्या सेवापूर्ती समारंभाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती देवीदासआबा धस,
समाजसेवक विजय गोल्हार,संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,
धर्मचार्य ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे,ह.भ.प.राऊतदादा,ह.भ.प.
निवृत्तीदादा बोडखे महाराज,
भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे,ह.भ.प.संतोष महाराज मोरे,ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,मोहन महाराज आमटे,
वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव तांदळे,आश्राजी महाराज आजबे,अंकुश महाराज कर्डीले,हौसराव महाराज मगर महाराज,माजी सभापती अशोक ईथापे,पत्रकार उत्तम बोडखे,
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख विजय आमटे,शिवाजी नाकाडे,
सुरेश माळी,संजयनाना गाढवे,
सरपंच ढोंबरे,रविंद्र ढोबळे,
पांडुतात्या झिंजुर्के,महादेव डोके,
सुर्यकांत मोकासे,सरपंच भरत जाधव,प्राचार्य महादेव दानवे,
महेशकुमार शिंदे,प्राचार्य सोपान शेकडे,रावसाहेब लोखंडे,नवनाथ तांदळे,दादासाहेब चितळे सर,
हारिभाऊ तांदळे,गजुकाका कुलकर्णी,भागचंद झांजे,
सुदामकाका झिंजुर्के,प्राचार्य डाॕ.
कैलास वायभासे,सरपंच बाळासाहेब मिसाळ,महादेव टकले
आदि सामाजिक,शैक्षणिक, वैचारिक,सांस्कृतिक,धार्मिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती ह.भ.प.बबन मगर सर आणि त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे पुढे म्हणाले की, देऊळगाव घाट हे घाटात असले तरी गावचे दोनशे ते अडीचशे लोक आर्मी आणि इतर क्षेत्रात या शाळेमुळे पोचले आहेत.अर्थातच देऊळगाव घाट शिक्षणामुळे समृद्ध झाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण हे मनुष्याच्या जीवनाचा पाया असून शेतकऱ्यांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.दुर्दैवाने अलीकडच्या काळात विद्यार्थी संख्या घटत असून अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होताना दिसत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या कामगारांच्या गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे.पालकांमध्ये दोन गट असून एक शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा आणि एक आर्थिक स्थिती संपन्न असणाऱ्यांचा त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्याची गरज आहे.बबन मगर सर हे इंग्रजी विषयाचे शिक्षक असून त्यांचे अध्यापन चांगले आहे. कीर्तना एवढेच अध्यापन हेही पुण्याचे काम आहे.त्यांचे अध्यापनाच्या अतिरिक्त तासिका घ्याव्यात ज्ञानात भर पडेल आत्मविश्वासही विद्यार्थ्यांचा वाढेल असे आवाहन त्यांनी केले.आज चांगल्या शिक्षणाची गरज असून विविध क्षेत्रात जाण्यासाठी तयार असावे क्रीडा क्षेत्रात ही नाव कमवा असे सांगून मुलींनी शिकावे मोठे व्हावे पालकांनाही त्यांना प्रोत्साहन द्यावे असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.यावेळी प्रस्ताविक प्राचार्य सोपान शेकडे यांनी केले. यावेळी प्राचार्य महादेव दानवे,भागचंद झांजे,माजी विद्यार्थ्थी शिंदे,मगर यांची कन्या सुकन्या मगर,बाळासाहेब मिसाळ,शिवाजी नाकाडे,ह.भ.प.श्रीनिवास घुगे,(आळंदी),समाजसेवक विजय गोल्हार,देविदास आबा धस, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल धर्माचार्य ह.भ.प.आजिनाथ आंधळे महाराज यांची भाषणे झाली.
दरम्यान या गावांमध्ये शाळा सुरु करण्यासाठी साहेबराव ठोंबरे,भास्करराव मस्के यांनी पाठपुरावा केल्याचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
सुत्रसंचलन प्रसिध्द निवेदक अमोल जगताप तर उपस्थितांचे आभार महादेव टकले सर यांनी मानले.
चौकट
-------------
देऊळगाव घाट
शिक्षणामुळे समृद्ध!
------------------------
आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट हे घाट असले तरी इथे शिक्षण आणि संस्काराची पायाभरणी आहे.या विद्यामंदिरात शिकून येथील अनेक जण विविध क्षेत्रात जाऊन स्वावलंबी जीवन जगत आहेत.खऱ्या अर्थाने देऊळगाव घाट हे शिक्षणामुळे समृद्ध झाले आहे असे गौरवोद्गार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी काढले.तेव्हा उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना प्रतिसाद दिला.
********************
0 टिप्पण्या