माजी सरपंच नामदेवभाऊंच्या आईचे त्यांच्या आईवडिलांनी जनाबाई असे ठेवले होते.७५०
वर्ष पुर्वी पंढरपूरला जनाबाई संत होत्या. दळिता कांडिता त्या पांडूरंगाचे नामस्मरण
करीत होत्या.त्यांचे विश्वच पांडूरंग होता. नामदेवभाऊंच्या आईचे विश्वच त्यांचे पती
रघुनाथराव राऊत (आण्णा) होते.रघुनाथ म्हणजे राघव.राघव म्हणजे श्रीराम भाऊंच्या आई
ह्या श्रीरामाच्या जानकी होत्या त्या सीता होत्या.त्यांच्यासाठीच संतश्रेष्ठ
तुकारामानी एक अभंग लिहिला आहे.त्यातील काही ओळी अशा आहेत. "पितृवचन सेवापति'हेचि
विष्णुची महापूजा, अनुभव नाही दुजा" त्यांच्या आयुष्य भराची निष्पत्ती काय? तर ती
अनन्यभावाने पतीची म्हणजे रघुनाथराव आण्णाची मनोभावाने केलेली सेवा,पतिची सेवा हीच
विष्णुचीपुजा.नव्हे, तीच महापुजा असे संत तुकाराम म्हणतात. ह्यापेक्षा अनुभव नाही
दुजा;भाऊचे पिताजी रघुनाथराव वर्षभरापूर्वी निघून गेले. नामदेवभाऊंच्या आईचा जीव
सैरभैर झाला. त्या दोघांच्या आकृत्या भिन्न होत्या.शरीर दोन होते.पण जीव एकच
होता.आण्णा गेल्यावर त्या लौकिक अर्थाने जगत होत्या.चार मुले,सुना,
नातू,नातसुना,नातजावाई पणतू हे सगळे होते. चिंतन,मनन,ध्यान,धारणा अंतर्मनी फक्त
विष्णुच्या म्हणजे पतीच्या विरहाच्या दाहाने त्यांचा आत्मा विव्हळ होत होता.शेवटी
त्यांना यश आले.त्यांचा विजय झाला;अन त्या सदेह रघुनाथरावांच्या शोधार्थ २ डिसेंबर
२०२२ रोजी निघून गेल्या.दोघे एकदाच एकाचवेळी जर गेले असते तर ? तर हे सर्व कुटुंब
हरणासारखे विव्हळ झाले असते. ते तर रघुनाथरावांच्या आत्म्याला ही आवडले नसते म्हणून
त्या कुटुंबाला सावरून धरण्यासाठी देहाने एक वर्षभर अत्यंत जड मनाने मागे
राहिल्या.पतीविरह सहन होण्यापल्याडचा झाला.अन सहजगत्या देहातून आत्मा बिलंग करून
त्यांच्या 'विष्णूची महापूजा' करण्यासाठी निघून गेल्या.श्रीमंती पैशाने नव्हे
सुखाने मोजायची असते.सुखाचे दुसरे नाव समाधान आहे. ज्याच्या घरात "आई वडील " सुखा
समाधानात,आनंदात आहेत ते घर पृथ्वीवरील नंदनवन असते.नंदनवने दुर्मिळ असतील.पण
आष्टीमध्ये असे एक नंदनवन होते.ते नामदेवभाऊ राऊतांचे घर होते.ह्या घराला नामदेव,
कालीदास,ज्ञानदेव आणि लक्ष्मीकांत उर्फ बिभिषण असे चार खांब होते. हे घर नव्हते हे
मंदिर होते.ह्या मंदिरात राम (रघुनाथ) आणि जानकी (जनाबाई) ह्यांच्या सजीव मुर्त्या
होत्या.ह्यांच्या सुना मंदिरातील नंदादीप होत्या.अन त्यांची बाळे गोपाळे
होती.विश्वचक्र हे अविरत फिरत असतांना काळ पुढे चालत असतो. भले आत्मा अमर,अमर्त्य
असू देत,पण एका प्रसंगी देह त्याग करावा लागतो.देहाला चिरंजीविता नाही म्हणून
काळचक्र नियमांना अनुसरून नामदेवभाऊंच्या पिताश्रीने आधी देह त्याग केला.अन पुन्हा
वर्षभरातच आईने ही तोच मार्ग अनुसरला. ह्या कुटुंबासाठी आता आभाळच रिते झाले.
नामदेव राऊत यांची खरी अडचण अशी झाली की,ते दररोजच आईचे पाय चोपीत असत.आता
त्यांच्यासाठी चेपण्यासाठी पायच उरले नाहीत.आता कॉटवर आई नाही ही कल्पनाच वेदना
देणारी आहे.कारण निरंतर आवडणारे हेचि ध्यान आता तिथे नाही. हाताने चाचपडून बघितले
तरी हाताला तिथे काहीच लागत नाही.मोक्षाचे म्हणजे मुक्तीचे चार प्रकार मानतात.
सलोकता,समिपता, सरूपता अन् शेवटची श्रेष्ठ मुक्ती ही सायुज्जता आहे;मोक्ष अन्
स्वर्गात फरक आहे.स्वर्गात राहण्याला मर्यादा नसते. मोक्ष चिरंतन असते. सायुज्जता
हा मोक्ष सर्व श्रेष्ठ मानला जातो. नामदेव राऊत यांची माता पितरे हे मोक्षाला
प्राप्त झाले.सायुज्जता हा मोक्ष त्यांना प्राप्त झाला. संत तुकारामांचा एक अभंग
असा आहे. माऊली ज्ञानदेव म्हणतात 'बाप रूखमादेवीवरू-विठ्ठलाचे भेटी-आपली संवसाठी
करूनी ठेला" 'बाप विठ्ठल-आई रूक्मिणी;हीच बिष्णुची महापुजा- अनुभव नाही दुजा असे
आचरण नामदेवभाऊंचे होते. म्हणून त्यांना माता पित्याचे भरभरून आशीर्वाद लाभले.आज
जेजे ह्या राऊत कुटुंबाचे आहे.त्या सर्वांच्या आणु, रेणू,परमाणूमध्ये त्यांच्या
आईचा आशीर्वादाचे लिंपण आहे.हिंदू धर्मामध्ये नद्यांच्या संगम जिथे होतो.तिथे स्नान
केल्यास पुण्य लाभते.दोन्ही नद्या जर पवित्र असतील अन् त्या पवित्र नद्यांचा संगम
जिथे झाला असेल.त्याला प्रयोग असे म्हणतात.मी हिमालयामध्ये असे प्रयाग खूप बघितले
आहेत; इथल्या सर्वच नद्या पवित्र आहेत; कारण त्या सर्वाच्या सर्व हिमालयाच्या कन्या
आहेत;नामदेवभाऊ त्यांच्या आईचे तळपाय नित्यनेमाने चोळीत असे.कशासासठी हा अट्टाहास
होता ? नामदेवभाऊना विश्वास होता की,आईच्या तळपायात रेषा आहेत. एक रेषा दुसऱ्या
रेषेला मिळालेली आहे.जिथे जिथे रेषांच्या संगम झालेला आहे,त्या संगमालाच नामदेवभाऊ
तीर्थप्रयाग श्रद्धापूर्वक समजत असत.अन् त्याच प्रयागात त्यांचे नित्य स्नान
असायचे. म.फुले यांंच्या विचारांचा प्रचार,पुरस्कार,स्वीकार नामदेवभाऊ करतात.मी
सूतक किती दिवसांचे असावे? हे सांगण्याऐवजी मी प्रथम त्याचा प्रयोग केला.तो माझ्या
आईच्या मृत्यु नंतर.मी पहिल्यांदा आईचे मरणाचे सूतक अवघे तीन दिवस पाळले.अन्
तिसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीचे व ठरलेले होते त्याच तीथीला लग्न केले.हे माझे एक
प्रकारचे बंड होते ? माझ्या ह्या कृतीला, डॉ. गुंजाळ,ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी
धामणगावकर,बापूसाहेब चौधरी,क्रांतीताई चौधरी,दरेकरनाना,रामचंद्र धसदादा ह्यांनी
पाठिंबा दिला. 'सकल तीर्थाचिये धुरे-जिया का माता पितरे-तथा सेवेलि कीर शरीरे-लोण
किजें ह्या कुटुंबाने माता पितरांना नुसते दैवत मानले असे नाही तर त्यांनी माता
पितरे परमदैवत मानले,बहुधा तो चित्रपट 'दादीमा'नावाचा असावा; त्या चित्रपटातल्या
काही ओळी अंशा होत्या. "ऐ माँ तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी? उसको नहीं
देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी? म्हणजे आईच्या रूपा स्वरूपापेक्षा ईश्वर
वेगळा काय असू शकतो? त्याला बघायची इच्छा असण्याचे कारणच काय ? कारण तो आई
तुझ्यापेक्षा काही वेगळा असू शकेल का?" है स्वर्ग इसी दुनिया मे कदमो के तलै तेरे ?
संताचे हे असे अभंगच आईमध्ये समावलेले आणि आहेत. लौकिक अर्थाने आई गेल्या.शरीर दिसत
नसले तरी त्यांचे अस्तित्व श्वासात आहेच. स्व.जनाबाई रघुनाथराव राऊत यांच्या प्रथम
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ....... -----------------------------
0 टिप्पण्या