
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टीचे माजी आमदार शिक्षण महर्षि भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतुन,आष्टी येथील छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्यावतीने दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीतील चार दिवसीय डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषीमंत्री धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे,कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी,पद्मभूषण पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.आज या राज्यस्तरीत कृषी प्रदर्शनाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सहभाग लाभावा यासाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंनी ,प्राध्यापक,शेतकरी,
सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील प्रदर्शनानिमित्त सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विठ्ठलराव बन्सोडे,ॲड.
रत्नदीप निकाळजे,उत्तम बोडखे,
बंडु पाचपुते,गणेश जठार,बाबु कदम,बाजीराव वाल्हेकर,अस्ताक शेख,रघुनाथ शिंदे,प्राचार्य डाॕ.
श्रीराम आरसुळ आदि पदाधिकारी,
कार्यकर्ते,विध्यार्थी,प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे बोलताना पुढे म्हणाले की,
आष्टी येथे होणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ..न भुतो न भविष्यती...होत आहे. हे कृषी प्रदर्शन चार दिवस आहे.कृषीविषयक प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहे.शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणारा हा आष्टी तालुका आहे.या तालुक्यात कृषी प्रदर्शन घेण्याचे योग आपल्याला आला आहे.आष्टी शहरात दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ चार दिवस राज्यस्तरीय डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे पहिल्यांदाच होत आहे .
भारत देशामध्ये हरितक्रांतीचे जनक म्हणून घेणारे आणि ग्रामीण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी संशोधन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आणि शेती पूरक आणि शेतीचे महत्व देशासह जगाला दाखवून दिले आहे म्हणून या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला डॉ.स्वामीनाथन कृषी प्रदर्शन असे नाव देण्यात आलेले आहे.या प्रदर्शनीमध्ये फळबाग भाजीपाला फुल शेती व वनौषधी, कापूस,ज्वारी,गहू,कडधान्य,तेलबिया,पाणलोट विकास,ऊस,पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय कृषी अभियांत्रिकी व अवजारे आदी विभागांसोबतच छञपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत.शेतकरी बंधूचे ग्रामीण विकासासंबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरणार आहे.याशिवाय गट शेती,स्वयंसहायता बचत गटांच्या यशोगाथा,महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषी उत्पादने,शेतकऱ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण शेती अवजारे आदींची अभिनव दालने प्रदर्शनीचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.या प्रदर्शनीमध्ये दोनशेहून अधिक दालने राहणार आहेत.हे कृषीप्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद पर्वणी ठरणार आहे.केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकरी बंधू-भगिनींना,युवक- युवतींना या प्रदर्शनीची सहभागी होणार आहेत.अतिशय भव्यदिव्य प्रमाणामध्ये या राज्यस्तरीय प्रदर्शन,कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू-
भगिनींना बघावयास मिळणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे-अवजारे,पीक संरक्षणाच्या विविध पद्धती,औषधी व सुगंधी जाती,फळे - फुले,रानभाज्याचे प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे.प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे. ही प्रदर्शन जिल्ह्यासह राज्यात बंधू-भगिनी, युवक-युवतीना रोजगार स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी प्रत्यक्ष अनुभवत आत्मसात करण्याची एक पर्वणीच ठरणार असल्याचेही यावेळी माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगीतले.
या कृषी प्रदर्शनामध्ये छञपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील उभारलेले उद्योग व त्यांचा अनुभवकथन करण्यासाठी उभारण्यात येणारी यशस्वी विद्यार्थी व्यावसायिकांची दालने या प्रदर्शनीचे आकर्षण ठरणार आहे.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात २०० कृषिविषयक दुकानंसह,खाऊ गल्लीची दुकाने सहभागी होणार आहेत.प्रदर्शनामुळे या भागातील शेतक-यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवत अल्पदरात आपली उत्पादने व सेवा लाखो ग्राहकांपर्यंत पोचवता येणार आहे.शेतकरी बांधवाना ही अगदी मोफत या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण दोन कोटी किमंतीचा दीड टन वजनाचा रेडा असणार आहे.या प्रदर्शनात डेअरी तंत्रज्ञान,कृषी तंत्रज्ञान,सोलर शासकीय योजना,शेती अवजारे,बी-बियाणे,कुक्कुटपालन खते,सिंचन,पतपुरवठा,हरितगृह, खाऊ गल्ली,लहाण मुलांसाठी खेळ गल्ली यासह विविध कृषी पिकासंदर्भात तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
-------------------------------
0 टिप्पण्या