Ticker

6/recent/ticker-posts

ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि महंत विठ्ठल महाराज यांची तीन तास बंद खोलीत चर्चा!

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॕड.बाळासाहेब आंबेडकर आणि श्रीक्षेत्र गहीनाथगडाचे महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज यांच्यात गुरुवारी दुपारी तब्बल तीन तास बंद खोलीत चर्चा झाली.दरम्यान संत वामनभाऊ यांच्या समाधीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतल्यानंतर ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी गडाच्यावतीने स्नेहभोजनही स्वीकारले.अचानक झालेल्या या प्रदीर्घ भेटीची चर्चा मात्र या परिसरात चर्चेचा विषय ठरला.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर संघर्ष करणारे ॲड.बाळासाहेब आंबेडकर दुपारी निवांत दिसले.त्यांनी अचानक बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहीनाथगडावर दुपारच्या वेळी महन्त विठ्ठल महाराज यांच्याबरोबर बंद खोलीत मुक्त संवाद साधला. दरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली. यासंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी राजकीय सामाजिक,धार्मिक,विषयावर चर्चा झाल्याचे समजले.एका वर्षावर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत.राजकीय नेते राज्यभराच्या वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधत आहेत. गुरुवारी ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अचानक संत वामनभाऊ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत हा गड राज्य आणि देशभराच्या धार्मिक नकाशावर आहे.लाखो भक्त येथे पुण्यतिथीला येतात.पुण्यतिथी जानेवारी महिन्यात असल्याने ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रणही दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे.ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि महंत विठ्ठल महाराज यांच्यामध्ये तब्बल दोन तासाहून अधिक बंद खोलीत चर्चेत कोणते विषय हाताळले गेले ? यासंदर्भात तालुका आणि जिल्हाभर चर्चेला उधाण आले आहे.यावेळी त्यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण,तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्रा.विष्णू जाधव, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,
तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,सचिन मेघ डंबर,शामसुंदर वाघमारे,सुभाष सोनवणे,राहुल सोनवणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या