
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील अनिषा ग्लोबल शाळेच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद,अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूल,आ.सुरेश धस यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्ष वयोगटाच्या मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत मुलांमध्ये संभाजीनगर विभागाच्या संघाने विजेतेपद पटकावले तर द्वित्तीय लातूर,तृतीय अमरावती संघाने बाजी मारली तर मुलींमध्ये लातूर विभागाच्या संघाने विजेतेपद मिळविले आहे.द्वितीय अमरावती,तृतीय नाशिक या संघाने बाजी मारली आहे.या विजेत्या संघांचा बीड जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख,नगर जिल्हाक्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर फुरंगे,क्रिडा अधिकारी अजय पवार,नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,सभापती शेख शरीफ,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,सुरेश वारंगुळे, गणेश शिंदे,अविशांत कुमकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्याहस्ते चषक,मेडल्स प्रदान करून गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या.खेळाडूनी संघभावनेने खेळून ही स्पर्धा यशस्वी केली.तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिषा ग्लोबल शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सर्वांचे आभार अनिल जगदाळे यांनी मानले.
चौकट
————
पराभवाला खचून न
जाता पुन्हा तयारी करा
—————————
खिलाडूवृत्ती जोपासल्यास आपले नक्कीच चांगले होते.खेळात जय -पराजय हा होतचं असतो.विजय झालेल्या संघाचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.पराभव झालेल्या संघाने खचून न जाता पुढील स्पर्धेसाठी तयारी करावी.खेळाडू हा सैनिकासारखा सदैव तत्पर असला पाहिजे.हार ही यशाची पहिली पायरी आहे.त्यामुळे खचून जाऊ नये असे क्रिडा अधिकारी अजय पवार यांनी सांगितले.
चौकट
—————
या खेळाडूंनी गाजवला दिवस तिसरा दिवसाच्या पहिल्या १७ झालेल्या लातूर विभाग विरुद्ध अमरावतीच्या १७ वर्ष वयोगटाच्या मुलींच्या अंतिम सामन्यात अमरावती संघाकडून गायत्री मोघे भक्ती महाडिक, श्रावणी माने, वैष्णवी दोलतोडे या चार खेळाडूंनी उत्कृष्ट चढाई अन् पकड करून सर्वांचे लक्ष वेधले तर अलफिया शेख,समिक्षा तुरे,नेहा राठोड स्नेह सोळंके या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
चौकट
—————
खेळाडूंनी मानले आ.धस
यांचे आभार मानले
——————————
आष्टी येथील अनिषा ग्लोबल या शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंचे राहण्याचे,जेवणाचे उकृष्ठ नियोजन आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.हे नियोजन अतिशय चांगले करत भोजन व्यवस्थाही चांगल्या दर्जाची केली असल्याचे अमरावतीचे संघाचे प्रशिक्षकांनी आपण एवढे सामने खोळलोत वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन अशी व्यवस्था कुठेच पाहिली नसल्याचे त्यांनी सांगत आ.धस यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या