Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची निवडणुक जाहिर ............ आ.सुरेश धस आ.बाळासाहेब आजबे यांंच्या समर्थकांमध्ये सरळ दुरंगी सामना रंगणार

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था संचालक मंडळाची निवडणुक जाहिर झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची " अर्थ " वाहीनी म्हणुन ओळख असलेल्या या पतसंस्थेच्या मतदारांची नुकतीच अंतीम मतदार यादी प्रसिध्द झाली आहे.इच्छूक उमेदवार निवडणूकीच्या तयारीसाठी धावपळ करीत आहेत.आ.सुरेश धस यांंच्याकडुन विद्दमान संचालक मंडळातील अर्धेआधिक संचालक ईच्छुक आहेत.तर आ.बाळासाहेब आजबे यांंच्याकडुन शिक्षकनेते बाळासाहेब महाडीक हे पॕनल उभारणीसाठी सज्ज झालेले आहेत.दोन्ही आमदार यांचे समर्थकांनी ही पतसंस्था आपल्याच ताब्यात कशी येईल यासाठी व्युहरचना सुरु केली आहे.सन.१९७४ साली स्थापन झालेली विवेकानंद शिक्षकांची पतसंस्था आहे. १९९९ पुर्वी माजी आ.भीमराव धोंडे यांंच्या समर्थकांच्या ताब्यात होती.सुरेश धसा आमदार झाल्यापासून म्हणजे सन १९९९ पासून तब्ल २४ वर्षे (दोन तप) आ.सुरेश धस यांंच्या समर्थकांच्या ताब्यात ही पतसंस्था आहे.आ.सुरेश धस यांनी स्वताः लक्ष घालून विवेकानंद पतसंस्थेचे रूपच बदलून टाकलेले आहे.चेअरमन मारुती पठाडे यांंच्या संचालक मंडळाने साडेसहा वर्षे उत्कृष्ट आणि काटकसरीचा कारभार केल्याने सभासदांमध्ये चांगले मत आहे. आष्टी तालुक्यातील शिक्षकांची प्रतिष्ठेची असलेली स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.या निवडणुकीत १७ संचालकां जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात येतील असा अंदाज आहे.सन २०१७ साली झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत तीन पॅनल व सहा अपक्ष उमेदवार असे एकुण १७ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते.या होणारा निवडणूकीत १७ जागेसाठी ४० उमेदवार रिंगणात उतरतील.विद्दमान संचालक मंडळ चेअरमन मारुती पठाडे,व्हाईस चेअरमन सुभाष भादवे,मानद सचिव गहिनीनाथ तोतरे, महेश शिंदे,संदीप खराडे,बापुसाहेब फसले,उत्तम भुकन,अल्ताफ शेख,दिलीप उढाणे, महादेव आमले,विठ्ठल शिंदे,सचिन वारंगुळे,शिवाजी खुडे,विकास मेहेत्रे,शिवाजी पांढरे,श्रीमती सुनिता झांजे-गांगर्डे,श्रीमती रुपाली उगले -कोरडे हे संचालक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या