आष्टी (प्रतिनिधी)
अहमदनगर- बीड - परळी हा एकूण २६१.२५ कि.मी.लांबीचा प्रकल्प आहे.दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ कि.मी.पुर्ण करुन अहमदनगर ते न्यू आष्टी अशी रेल्वे फेरीही सुरू झाली.न्यू आष्टी ते विघनवाडी हा ६७.१२ कि.मी.रेल्वेमार्ग पुर्ण होणार आहे. डिसेंबर २०२३ अखेर अहमदनगर ते इघनवाडीपर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.एकूण २६१.२५ कि.मि.पैकी १३३.३ कि.मी.काम आता पुर्ण होऊन लवकरच या मार्गावर रेल्वे धावणार आहे.परळीपर्यंत रेल्वे पोहोचण्यासाठी आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत १४७.७७ कि.मि.मल्टीट्रॅकिंग पूर्ण केली. २९८३.४७ कोटी रुपये खर्च आजपर्यंत झाला आहे.


आता लवकरच अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात आहे.अहमदनगर-
बीड-परळी रेल्वे मार्गाचे प्रगतीपथावर काम सुरू आहे.हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी.चा आहे.यापैकी दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर-न्यू आष्टी पर्यंत पुर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली. परंतु मध्यंतरी या मार्गावरील रेल्वे डब्यांना आग लागल्याने सध्या यारेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.दुसऱ्या टप्यात न्यू आष्टी ते विघनवाडी हे काम डिसेंबरअखेर पुर्ण होत आहे.ती रेल्वे फेरी लवकरच सुरु होणार आहे.
----------
*आतापर्यंतच्या कामाची अशी आहे स्थिती...*
....................
रेल्वे मार्गाची एकूण लांबी - २६१.२५ कि.मी.काम पूर्ण होऊन रेल्वे धावली - ६६.१८ कि.मी.बाकी असलेले काम - १९५.२५ कि.मी.,एकूण कामाची प्रगती - ७८ टक्के,एकूण झालेले भूसंपादन-१८०३ हेक्टर (९९ टक्के),प्रकल्पाचा खर्च - ४८०५.१७ कोटी,
आजपर्यंतचा खर्च ३६९९ कोटी रुपये,
_______
*कामे अशी झाली.*
..............
९७.४० टक्के (भराव व माती काम),७७ टक्के (मोठे पुल - ४९ पूर्ण),
८३ टक्के (छोटे पुल - २५० पूर्ण), ४१ टक्के (रेल्वे रुळाचे काम - ११८ कि.मी.).
-------------
*पूर्ण झालेला टप्पा -*
.......................
अहमदनगर ते आष्टी (६६.१८ कि.मी.),
पूर्णत्वास असलेला टप्पा
आष्टी ते इघनवाडी ६६.१२ कि.मी.
प्रगतीपथावरील टप्पा
विघनवाडी ते परळी १२७.९५ कि.मी.
0 टिप्पण्या