Ticker

6/recent/ticker-posts

मनसेच्या दीपोत्सव काव्यसंध्येत रांगोळी स्पर्धक विजेत्यांना सोन्याची नथ बक्षीस

आष्टी (प्रतिनिधी) मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जगदंबा तरुण मंडळ,सायकडगल्ली,आष्टी यांंच्यावतीने दि.२२ नोव्हेंबर रोजी कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,हरीश हातवटे,नागेश शेलार, महादेव लांडगे,विश्वेश्वर बोडखे,राजेंद्र लाड यांच्या उपस्थितीत दीपोत्सव काव्यसंध्या संपन्न झाली. यावेळी रांगोळी स्पर्धेतील सर्व यशस्वी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम,शिवाय प्रथम आलेल्या वैष्णवी वराट,सलोनी माने,वैष्णवी दरेकर या स्पर्धकांना सोन्याच्या नथी पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसाच्या स्वरूपात देण्यात आल्या.सोन्याची नथ या स्वरूपात पारितोषिक देण्याचा हा बहुदा पहिल्यांदाच पायंडा असावा.रांगोळी स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना सोन्याची नथ बक्षीस हा आष्टी तालुक्यात सध्या कुतूहलाचा विषय आहे. याबद्दल मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी शिरूर तालुकाध्यक्ष सोपान मोरे,आष्टी तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे,संजय फरताडे,तुषार चव्हाण, सुनिल पाचपुते, भरत चव्हाण,मच्छिंद्र गरजे,सतीष शिंदे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या