आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी अत्यंत मेहनतीने आणि परिश्रमाने राज्य,राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.या कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंनी दर्जेदार खेळ करावा आणि खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करावे असे आवाहन बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी केले.
यावेळी आ.सुरेश धस म्हणाले की, आष्टी येथे आयोजित करण्यात आलेली ही तिसरी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहे.आम्ही गेल्या एक वर्षापासून प्रयत्न केल्यानंतर या १७ वर्षाखाली मुले आणि मुलींच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजक म्हणून आम्हाला संधी दिली आहे.याबद्दल सर्व क्रीडा विभागाचे आभार व्यक्त करीत आष्टी तालुक्यातील महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,पैलवान सोनाली तोडकर,पैलवान राहूल आवारे आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे यांनी जागतिक पातळीवर आपले क्रीडा कौशल्य दाखवले आहे.आष्टी येथील निवृत्ती धस माध्यमिक विद्यालयाचे खेळाडूंनी कबड्डी आणि खो - खो या क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य मिळवले आहे.आष्टीतील खेळाडूंनी जागतिक पातळीवर आपले क्रीडा कौशल्य दाखवले आहे असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये शहरी भागातील खेळाडूंपेक्षा कौशल्य अधिक असते मात्र आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांना शहरी भागासारख्या सुविधा मिळत नाहीत परंतु तरीही अत्यंत जिद्दीने आणि परिश्रमपूर्वक ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथे महाराष्ट्र क्रीडा संचालनालय,कबड्डी असोसिएशन बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि आष्टी येथील अनिषा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी हे मान्यवर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर या स्पर्धेचे मुख्य संयोजक आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,भाजपानेते ॲड.
वाल्मिकतात्या निकाळजे,जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, सौ.प्राजक्ताताई धस,पोलीस निरीक्षक
संतोष खेतमाळस,विजय गोल्हार,
भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के,चेअरमन आदिनाथ सानप,
किशोरनाना हंबर्डे,जि.प.सदस्य अमर निंबाळकर,जि.प.सदस्य माऊली जरांगे,सभापती बद्रीनाथ जगताप,
सभापती रमजान तांबोळी,गणेश शिंदे,कुस्तीपटू सोनाली तोडकर,खेळाडू संदेश देशमुख,सुखलाल मुथा,संतोषशेठ मेहेर ,अनिलतात्या ढोबळे,रामशेठ मधुरकर,यशवंत खंडागळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.डॉ.प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की,



सध्या क्रिकेट या खेळाला इतर मैदानी खेळापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते परंतु क्रिकेटमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रगतीसाठी शहरी भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी नैपुण्य दाखवावे लागते.क्रिकेट या खेळाला इतर मैदानी खेळापेक्षा कमी प्रसिद्धी मिळत आहे.बीड जिल्ह्यातील पैलवान राहूल आवारे आष्टी येथील पैलवान सोनाली तोडकर यांनी राष्ट्रकुल स्पर्धा गाजवल्या असून जिल्ह्यातील सचिन धस याने १९ वर्षाखालील क्रिकेटच्या भारतीय संघामध्ये प्रवेश मिळवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा विभागाकडे लक्ष दिले असल्याने भारतीय खेळाडुंनी अनेक प्रकारांमध्ये जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे.शालेय स्तरावरील १९ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातील संघांनी या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत भाग घेतला असून प्रत्येक विभागातील दर्जेदार संघ या ठिकाणी आपल्या क्रीडा नैपुण्याचे प्रदर्शन करणार असून या सर्व खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे आणि खिलाडू वृत्ती जोपासून आपल्या पुढील प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.यावेळी बोलताना मुख्य संयोजक आ.सुरेश धस म्हणाले की,आष्टी येथे आयोजित करण्यात आलेली ही तिसरी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असून आम्ही गेल्या एक वर्षापासून प्रयत्न केल्यानंतर या १७ वर्षाखाली मुले आणि मुलींच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजक म्हणून आम्हाला संधी दिली आहे.याबद्दल सर्व क्रीडा विभागाचे आपण आभार मानतो असे सांगत आष्टी तालुक्यातील महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,पैलवान सोनाली तोडकर,
पैलवान राहूल आवारे आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे यांनी जागतिक पातळीवर आपले क्रीडा कौशल्य दाखवले आहे.आष्टी येथील निवृत्ती धस माध्यमिक विद्यालयाचे खेळाडूंनी कबड्डी आणि खो-खो या क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य मिळवले असून या संघाचे मार्गदर्शक विष्णू आदनाक,अनिल जगदाळे आणि कैलास जगदाळे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या संघास मार्गदर्शन केले आहे आणि त्याचे फलित म्हणून या संघाने संभाजीनगर विभागांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये शहरी भागातील खेळाडूंपेक्षा कौशल्य अधिक असते मात्र आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांना शहरी भागासारख्या सुविधा मिळत नाहीत परंतु तरीही अत्यंत जिद्दीने आणि परिश्रमपूर्वक ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे असे सांगितले.उद्घाटन समारंभ नंतर या विभागातील संघांमध्ये सामने पार पडले.सुत्रसंचलन बाळासाहेब जगताप यांनी तर आभार गणेश शिंदे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या