उत्तम बोडखे,आष्टी.
---------------
एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्याची होत असलेली पिळवणूक कशी होते. या सर्व संकटाना तोंड देऊन तो शेतकरी आपल्या जीवनाची बिघडतं चाललेली परिस्थिती सुधारण्यासाठी करत असलेला प्रयत्नाला समाज आणि निसर्ग कसा विस्कटून टाकतो.या अशयावरती केलेलं हे व्हिडिओ सॉंग मल्हार गार्डन पुणे येथे प्रदर्शित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी खूप मोठी गर्दी झाली.या शुभारंभ कार्यक्रमास
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य सतीशआबा शिंदे,टायगर ग्रुपचे अनिकेतभाऊ घुले,नगरसेवक शांतराम बापू भालेकर,नगरसेवक प्रवीण भालेकर,युवानेते दादा नरळे,टायगर ग्रुपचे सिद्धु गायकवाड,बजरंग दलाचे सागर चव्हाण,अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे,केसनन गावचे सरपंच युवराज अप्पा ढोरे,दबंग सरपंच रुद्रा कदम,सरपंच बबन डोके,
सरपंच सतीश ढवळे (मेजर),
माथाडी उपाध्यक्ष बाबू शिंदे मामा,
योगेश सुपेकर सर,महादेव खामकर
योगेश गुंड,गणेश रावडे,अमोल गवळी,भाऊसाहेब मुरकुटे,शिवाजी सगळे, ऑल फेमस रीलस्टार आणि नामांकित डायरेक्टर,प्रोड्युसर,
कोरिओग्राफर, कलाकार उपस्थित होते.पुण्यात हा शो अगदी थाटात पार पडला.
आष्टी तालुक्यातील मातकुळीचा तरुण फिल्म निर्माता उमेश डोके,दिग्दर्शक कुलदीप जाधव दिग्दर्शीत सरकार फिल्म प्रोडक्शनच्या प्रस्तुतीचे रसिकांना आकर्षण ठरणारा आणि अभिनेत्री कावेरी घंगाळे आणि कोंडीराम वाघमोडे मुख्य कलाकार असलेला चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कावेरी घंगाळे,कोंडिराम वाघमोडे,उमेश डोके ,बापू जाधव ,बालकलाकार अर्पण जाधव,ज्ञानेश्वरी जाधव
सहकलाकार सचिन जाधव,सागर पालवे असुन डीओपी आणि एडिटिंग ऋषिकेश वारभोग
सहदिग्दर्शक अशोक तरटे
कथा कुलदीप जाधव यांंची आहे.
संतोष सरडे आणि दयानंद बडे हे गायकवाड आहेत.सरकार फिल्म प्राॕडक्शनचे प्रेमाचं पाखरू,अंबा बसली घटाला,जोगवा मागते येडामाईचा,प्रेमात पडावस वाटल हे व्हिडिओ साँग गाजले आहेत.
संगीत संतोष सरडे यांचेच आहे.एस.के.फॕमीली,सचिन पारवे यांचे विशेष सहकार्य आहे.
अस्सल रांगड्या ग्रामीण वास्तवाला धरून केलेला अत्यंत संयमितपणे तरुणाईच्या काळजातला ठाव घेत केलेली निर्मिती अन् अत्यंत संवेदनशील मनापासून आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या मातकुळीसारख्या एका छोट्या खेड्यातून पुणे गाठत फिल्म क्षेत्रात केलेली दमदार एन्ट्री तमाम रसिक प्रेक्षकांना आवडणारे ठरू शकेल.
" प्रेमाचं पाखरू " हे गीत सुरुवातीलाच प्रचंड प्रेमाने नाहून गेलेल्या तरुण तरुणाईच्या ओठावर न दिसेल तरच नवल.सरकार प्रोडक्शनच्या माध्यमातून फायनली " प्रेमाचे पाखरू " हा पूर्ण व्हिडिओ सॉंग नुकताच आलेला आहे.व्हाॕट्सअप स्टेटस इंस्टाग्राम स्टेटस फेसबुक स्टेटस व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिसाद मिळतो आहे.
" सरकार फिल्म प्रोडक्शन " प्रस्तुत निर्माता उमेश डोके यांच्या अत्यंत परिश्रमपूर्वक आणि समाजाची वास्तविक सद्यस्थिती समोर ठेवून केलेला हा प्रयोग निश्चितच रसिक प्रेक्षकांना आवडू शकेल.यात कलाकार म्हणून कावेरी घंगाळे -डोके,उमेश डोके, सिद्धेश्वर झाडबुके, सोनाली जळगावकर,स्नेहल माजिरे, माऊली जाधव,नवनाथ खरसाडे,भारत हत्ती,शंभू मंडळ,प्रकाश राठोड,गणेश रावडे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.हर्षदा पवार सरपंच बोपगाव ,योगेशनाना फडतरे,नागेशभाऊ फडतरे,प्रकाश फडतरे आणि समस्त बोपगाव ग्रामस्थांनी यासाठी विशेष सहकार्य केले आहे.दिग्दर्शक म्हणून संतोष अवचिते तर आदित्य थोरात यांनी छायांकन केले आहे गणेश घागरे यांनी ड्रोन पायलट म्हणून तर कॅम्प असिस्टंट म्हणून श्रीकांत कांबळे तर आदित्य फिल्म स्टुडिओची संकलन आहे. आरडी इव्हेंट यांचा कॅमेरा इक्वीपमेंट आहे.करेक्शनसाठी कश्यप यांची भूमिका आहे.गीताचे गायक आकाश ढवळे तर अनुराधा गायकवाड गायक आहेत रंगभूषाची जबाबदारी स्नेहल मांजरे तर राहुल संत यांनी संगीत दिले आहे.रेकॉर्डिंग स्टुडिओ म्युझिकल राइट्स यांचा आहे.अशा अत्यंत तरुणाईच्या प्रेमाच्या जगातील वास्तवाला आपल्या मिठीत घेऊन हिरो आणि हिरोईन यांनी केलेली दिलखुलास अदाकरीतील नवरंगणात्मक शैली रसिक प्रेक्षकांना पाडल्याशिवाय राहणार नाही.एकूणच बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मातकुळी या अत्यंत छोट्या गाव वस्तीतील उमेश डोके हा निर्माता आणि अभिनेता आहे.


0 टिप्पण्या