आष्टी (प्रतिनिधी) प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावे हे स्वप्न असते.गरीब समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना तर घरकुल म्हणजे एक दिव्य स्वप्न असते.



ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या अनेक योजना राबविते.या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे.
महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात महाआवास अभियान २०२३ - २०२४ राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री ना.गिरीश महाजन बोलत होते.
कार्यक्रमास व्यासपीठावर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,ग्रामसडक योजनेचे सचिव के.पी.पाटील,
कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर,नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी,
राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ.राजाराम दिघे उपस्थित होते.
महाआवास अभियानबाबत सादरीकरण राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. दिघे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान अभियान पुस्तिका,
मागील वर्षाची अभियान गौरव गाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अभियानाच्या माहिती पोस्टरचे विमोचनही करण्यात आले. याप्रसंगी मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल मंजूरीपत्र देण्यात आले.
सन २०२१- २०२२ चे महाआवास अभियान अधिकारी यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणमधील राज्य समन्वयक डॉ.
संघरत्न सोनावणे,बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील संत शेख महंमदबाबा यांची पावनभुमी असलेल्या वाहिरा गावाचे सुपुत्र वास्तुविशारद परमेश्वर शेलार,लेखा सहायक अंकिता राऊळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला विभागीय आयुक्त,
जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,उपायुक्त (विकास),ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक,गटविकास अधिकारी,विभागीय प्रोग्रॅमर,डाटा एन्ट्री ऑपरेटर,ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
वास्तुविशारद परमेश्वर शेलार यांचे या पुरस्काराबद्दल आ.
बाळासाहेब आजबे,
आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.दादासाहेब झांजे,सुनिल शेलार,
सेवानिवृत्त विमा अधिकारी सुभाष पगारे यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या