Ticker

6/recent/ticker-posts

समाजप्रबोधनकार ह.भ.प.इंदुरीकर महाराज यांना जामीन मंजुर

आष्टी (प्रतिनिधी) समाजप्रबोधनकार तथा नामवंत कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात मोठी अपडेटसमोर आली आहे.ह.भ.प.इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळालाय.अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,काही महिन्यांपूर्वी ह.भ.प.इंदोरीकर महाराजांनी अपत्यप्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा करण्यात आला होता.संगमनेर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असताना न्यायालयाने जामीन अर्ज सुनावणीसाठी २४ नोव्हेंबर तारीख दिली होती मात्र सुनावणीच्या एक दिवस आधीच ह.भ.प.इंदोरीकर महाराज स्वतः कोर्टात हजर राहिल्याने वकिलांनी न्यायालयाला विनंती केल्याने त्यांना २० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला अशी माहिती ह.भ.प.इंदोरीकर महाराजांचे वकील ॲडव्होकेट के.डी.धुमाळ यांनी दिली आहे.प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरुद्ध संगमनेर कोर्टात केस सुरू आहे.आम्ही महाराजांमार्फत जामीन अर्ज ठेवला होता त्यावर आम्ही आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर मेहरबान कोर्टाने जामीनाच्या निर्णयासाठी २४ नोव्हेंबर तारीख दिली होती.तथापि २४ तारखेला महाराजांचे तीन मोठे कार्यक्रम आहेत.जे रद्द करण्याजोगे नव्हते त्यामुळे गुरुवारी इंदुरीकर महाराज यांनी सकाळचे कार्यक्रम रद्द केले आणि आज जामीन देता येईल का ? यासंदर्भात आम्ही न्यायालयासमोर जामीन अर्ज देऊन विनंती केली.त्यावरून मा.न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर ह.भ.प. इंदोरीकरांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील ॲडव्होकेट के.डी.धुमाळ यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या