Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त शिक्षक भगवान लटपटे यांचे निधन..

आष्टी(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव येथील रहिवासी व बीड येथील भगवान विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक भगवान वामनराव लटपटे(वय ७५ ) यांचे दि.३१ ऑक्टोंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर नागरगोजेवस्ती क-हेवडगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.जुन्या पिढीतील एक आदर्श शिक्षक आणि अत्यंत मनमिळावु स्वभावाचे होते.त्यांचे संपुर्ण कुंटुंब वारकरी संप्रदायातील आहे.विशेष म्हणजे सं वामनभाऊ यांच्या पालखी दिंडीत त्यांच्या कुंटुंबातील अनेक सदस्य पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात. भगवानराव हे निष्ठावान आणि संपुर्ण आयुष्य वारकरी विचाराने जगले. अंत्यविधीस समाजसेवक विजय गोल्हार,माजी उपसभापती आदिनाथ सानप,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे,क-हेवडगांवचे सरपंच परिवंत गायकवाड,माजी सरपंच जालिंदर गायकवाड, सरपंच बळीराम गिते, पत्रकार उत्तम बोडखे, मुख्याध्यापक शाम शेकडे,आष्टी दुध संघाचे माजी चेअरमन भगवान सांगळे,हरिनारायणआष्टा ग्रामपंचायतचे सरपंच गणेश माळवे,माजी सरपंच जालिंदर नागरगोजे,डाॕ.मंगेश ढेरे,ॲड.मिलींद उबाळे, ॲड.महेश गर्जे,ॲड, अजय तांदळे,ॲड.राजेश आडसुळ,ॲड.अनिल तिडके,ॲड.प्रविण राख,केज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती सविता शेप, डॉ.सुनिल गदादे आदि राजकीय ,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड न्यायालयातील वकील अॕड.भाऊसाहेब लटपटे, महिंदा येथील संत नारायण महाराज विद्यालयातील शिक्षक रावसाहेब उर्फ बंडु लटपटे,केज येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.शोभा बाबासाहेब नागरगोजे आणि सौ.शैला राजेंद्र बांगर यांचे ते वडील होते.भगवानराव लटपटे यांंच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यापाठीमागे पत्नी, दोन मुले,दोन मुली,जावाई,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. दि.९ ऑक्टोबर रोजी बावी येथे दशक्रियाविधी होणार आहे.यावेळी महंत आजिनाथ महाराज तारकेश्वरगडकर,ह.भ.प.काशीनाथ महाराज यांंचे प्रवचन होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या