Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू धर्माप्रमाणे आपण नियम व चौकटीमध्ये राहून आचरण केले तरच हिंदुधर्म टिकणार* *----ह.भ.प.भरत उर्फ बाळासाहेब शिंदे महाराज*

आष्टी प्राचीन वैश्विक हिंदवी स्वराज्य आणि हिंदू धर्म संस्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक समाज धुरिणांनी,संत महंतांनी आपले आयुष्य खर्च केले आहे. त्यामुळे आपण आपल्या या प्राचीनतम आणि उच्चतम मूल्य जपणाऱ्या हिंदू धर्माप्रमाणे आचरण करावे आणि हिंदू धर्माप्रमाणे आपण नियमांमध्ये,चौकटीमध्ये राहून आचरण केले तरच हिंदुधर्म आणि पर्यायाने आपण सर्व जण टिकणार आहोत असे प्रतिपादन " चांडाळ चौकडीच्या करामती " या वेब सिरीजद्वारे प्रसिद्धीस आलेल्या ह.भ.प. बाळासाहेब उर्फ भरत महाराज शिंदे यांनी केले. आष्टी तालुक्यातील राजकारणातील भीष्म पितामह माजी आमदार साहेबराव दरेकर यांंच्यावतीने आयोजित कोयाळ येथील श्रीराम मंदिरामध्ये जाहीर हरी कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.आपल्या या कीर्तन सेवेमध्ये त्यांनी विनोदाचे हास्यकल्लोळ उडवून दिले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या हिंदू धर्मामध्ये शिक्षण घेतलेल्यांपैकी ५० टक्के हिंदू धर्मियांना धर्माविषयी अभिमान असल्याचे दिसून येत नाही कारण आपल्या धर्मातील दोष आपणच दाखवून देतो आणि धर्माविरोधात संशोधन करण्याचा प्रयत्न करतो,जसे की " देव कुणी पाहायला का ? देव कुणाला दिसलाय का ? असे भंपक प्रश्न विचारतात असा हा आपला पूर्वापार प्राचीन परंपरा लाभलेला वैश्विक हिंदू धर्म अनेक धर्मगुरूंनी,महान संतांनी, समाज सुधारकांनी आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्मासाठी मरावे कसे ? याचे आदर्श उदाहरण घालून दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी मोठे काम केले आहे.आपण मात्र हिंदू धर्म नीती नियमाप्रमाणे आचरण करत नाहीत.मुस्लिम धर्मातील पाच वर्षाचा मुलगा देखील डोक्यावर गोल टोपी घालून धर्माविषयी चिंतन करत असतो.उच्च शिक्षण घेतलेले मुस्लिम समाजातील अनेक जण नोकरीत आहेत.त्यांच्यापैकी कोणी अल्ला कोणी पाहिलाय का ? असं म्हणतोय का ? आज सर्व समाजाविषयी स्पष्ट भूमिका घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.या भारतात राहून भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंग्याला नमन करणारा मुस्लिम हा आपला असून त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मात्र जो भारतात राहून भारत देशाचं खाऊन पाकिस्तानचे गोडवे गातो तो आपला नाही अशा प्रवृत्ती ठेचून काढण्याचे गरज आहे.हिंदू धर्मियांनी हिंदू धर्माचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने आपापला धर्म पाळला पाहिजे म्हणजे आईने आईचा धर्म पाळायचा,वडिलांनी वडिलांच्या धर्माप्रमाणे आचरण करायचे,मुलींनी मुलींचा धर्म पाळायचा,विवाहित मुलाने त्याचा धर्म पाळायचा,सासूने तिचा धर्म पाळायचा, सुनेने तिचा धर्म पाळायचा,अशाप्रकारे सर्वांनी धर्माच्या नियमाप्रमाणे काम केले तर धर्म कधीच संपणार नाही असे सांगून ते पुढे म्हणाले.रामायणामध्ये सीतामाईला पळवण्याचे काम रावणाने केले होते त्यांना सोडवण्यासाठी प्रभुरामचंद्रांना जावे लागले त्याप्रमाणेच आजही मुलींनी घराबाहेर जाताना अत्यंत काळजीपूर्वक आपले आचरण ठेवावे कारण त्यांना फुटा फुटावर रावण प्रवृत्ती आणि महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण करणारी प्रवृत्ती असलेल्या दु:शासनाचा सामना करावा लागतो आहे.कोणावरही विश्वास ठेवू नका.मुलींनो फक्त तीन व्यक्तींवर विश्वास ठेवा आई,वडील आणि सख्खा भाऊ यांचे वरच विश्वास ठेवा या तीनच व्यक्ती निस्वार्थी आहेत यांचे व्यतिरिक्त कोणीही विश्वास पात्र नाही.काहीतरी स्वार्थ बुद्धी, द्वेषबुद्धी ठेवूनच तो तुमच्याशी आचरण करत असतो.हिंदू धर्मातील युवकांनी आणि युवतींनी आचरणाच्या चार पायऱ्याप्रमाणे आचरण करावे त्यामधील पहिली पायरी म्हणजे शिक्षण, अगोदर शिक्षण परिपूर्ण घ्यावे दुसरी पायरी म्हणजे करिअर विशिष्ट ध्येय ठेवून जीवनामध्ये अभ्यास करून करिअर करावे, तिसरी पायरी म्हणजे लग्न आणि चौथी पायरी म्हणजे आयुष्यभर प्रेम करत राहणे असे या चार पायऱ्या यशस्वी जीवनाच्या आहेत परंतु आजकालची मुले पहिल्या पायरीवरून थेट तिसऱ्या पायरीवर किंवा चौथ्या पायरीवरच झेप घेतात त्यामुळे ते अपयशी होतात. कमवायची अक्कल नसताना प्रेमाच्या भानगडीत पडतात आणि अयशस्वी होतात त्यातून अनेक सामाजिकदृष्ट्या समस्या निर्माण होत असतात. हिंदू सणवारामध्ये आपणच हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतो. इतर धर्मियांमध्ये अशा अनिष्ट प्रथांना थारा नाही.डीजे आणि धांगडधिंगा हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे.महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुलींनी एक लक्षात ठेवावे या परिसरात मोकाट,सैराट मोटरसायकलीवर फिरणारे कधीच हिरो नसतात.त्यातील कोणीही यूपीएससी, एमपीएससी, किंवा मेडिकल इंजिनिअरिंगला अभ्यास करत नसतो परंतु आपले दुर्दैव असे की या मुलींना हे असले हिरो वाटतात आणि २०,२० वर्ष ज्या आईबापांनी संस्कार करून वाढवले त्यांना विसरून अशा मुलांबरोबर या पळून जातात हे अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगत त्यांनी हिंदू समाजातील तरुण-तरुणींना वैभवशाली प्राचीन परंपरा लाभलेल्या हिंदू धर्माचे रक्षण करायचे.हिंदू धर्मातील वाईट परंपरांचे खंडन करायचे.हिंदू धर्मातील जातीपातीत भांडण लावणाऱ्यांना उघडे पाडायचे अशा पद्धतीने आपली जीवन पद्धती अंगीकारावी आणि हिंदू धर्मातील चांगल्या संस्कारीत असलेल्या परंपरांचे पालन करत आपली जीवनपद्धती सुधारावी असे सांगितले. या संपूर्ण किर्तन सेवेमध्ये ह.भ.प.बाळासाहेब उर्फ भरत महाराज शिंदे यांनी समाजातील. वागणूक,चालीरिती यामधील बारकावे. अत्यंत नर्म विनोदी पद्धतीने सांगत समाज प्रबोधनपर आपली कीर्तन सेवा दिली. यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर, अनिल गरुड महाराज,नामदेव राऊत,विक्रम पोकळे,उत्तम बोडखे, सुभाष वाळके, प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे,
आप्पा वाडेकर,आदिनाथ बेलेकर,सुभाष रासकर, पोपटराव घुले, भाऊसाहेब थेटे,प्रा. दादा विधाते,गोरख पारखे,तात्या सायंबर, सरपंच सागर दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या