Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगर - बीड राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड,कडा, शेरी,वटणवाडी,जळगांव,कासारी या सहा गावांची ग्रामस्थ रस्त्याच्या कामावरील धुळीने हैराण ............. ठेकेदार धुळ दाबण्यासाठी नियमाप्रमाणे पाण्याचा वापर करेना ; पुढारी मुग गिळुप गप्प ?

उत्तम बोडखे,आष्टी. --------------- अहमदनगर-बीड या राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट राहिलेले साबलखेड ते आष्टी हे काम सुरु आहे.सिमेंट काॕक्रेटचे काम कासव गतीने सुरु आहे तर जागोजाग खोदकामामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोळ उडत असल्याने शेतीपिकासह,नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.संबंधित ठेकेदार धुळ दाबण्यासाठी नियमाप्रमाणे पाण्याचा वापर करेना.आणि तालुक्यातील पुढारी,नेतेमंडळी मुग गिळुप का गप्प ? हे सुत्र सामान्यांना समजेना.... संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पाणी टाकवे असे सांगीतले तर ते अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. अहमदनगर- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड,कडा, शेरी,वटणवाडी,जळगांव,कासारी ही सहा गावे आहेत.त्यात कडा ही मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी ४० गावचे लोकं आपले दैनंदिन व्यवहारासाठी येतात.त्यात या रस्त्याचे काम साबलखेड ते आष्टी १७ कि.मी. कासवगतीने सुरु आहे.ठिकठिकाणी पुलांची काम सुरू आहेत परंतु अशा धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारीचा उपाय केलेला दिसून येत नाही.यामुळे धूळ डोळ्यात जाऊन अपघात होत आहेत.
या अपघाताला जबाबदार कोण ? अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रोडवरून लहानमोठ्या वाहनांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या महामार्गालगत साबलखेड,कडा,शेरी बु., खाकळवाडी,वटणवाडी,जळगाव,कडा कारखाना,कासारी व आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर मोठंमोठी जड वाहने,आलिशान गाड्या भरधाव वेगाने जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व नागरिकांचे डोळे,श्वसनाचा त्रासामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सध्या या महामार्गाचे काम सुरु असल्याने त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकासह मोटरसायकलवर प्रवास करणारे प्रवासीवर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे.कासारीजवळ रस्त्यावर असणारे खड्डे दुरुस्त करण्यासाठी शेकडोवेळा संबंधित ठेकेदारचे मुकादम यांना सांगीतले परंतु ते ऐकुन न ऐकल्यासारखे करतात.याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नामदेव राऊत,अनिलतात्या ढोबळे यांनी केला आहे.रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले जात नाहीत.या रोडवर मातीमिश्रित मुरूम टाकून कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्यामुळे या महामार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे.या मार्गावरून चालतांना पादचारी ही पूर्णपणे त्रस्त झाले आहेत.पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले आहे.याचे रुपांतर धुळीत झाले आहे.ही सर्व धूळ प्रवाशांच्या व महामार्गावरील परिसरात असणार्‍या गावातील नागरिकांच्या नाकातोंडासह अंगावर उडत आहे.यामुळे येथील रोडलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचा,नागरिकांच्या व प्रवासांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी,खोकला व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.महामार्गावरील चौपदरी करणाचे काम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या आशिर्वादाने गेली आठ महिन्यापासून अतिशय संथ गतीने सुरु आहे.हे काम केव्हा पूर्ण होईल ? याची खात्री देता येत नाही.यामुळे प्रवासीवर्ग मात्र त्रस्त झाला आहे. यामुळे कंबरदुखीसारखे आजार होतात तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे रोड लगत राहणाऱ्या लोकांना व प्रवाशांना खोकला,सर्दी यासारखे आजारासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतांना दिसत आहेत.दुचाकीवरून प्रवास करणार्‍यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असून उडणारी धूळ प्रवाशांच्या डोळ्यात गेल्यामुळे अपघातही होतांना दिसत आहे. चौकट ------- या महामार्गावर ताबडतोब पाणी मारून धुळीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवक्रांती प्रदेशाध्यक्ष दिपक सोनवणे,कड्याचे माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे यांनी केली आहे. चौकट -------------
संबंधित गुत्तेदाराला धुळीवर उपाययोजना करण्यास सांगितले असल्याचे अभियंता व्हि.एस.भोपळे सांगतात. धुळीमुळे पिकांचे नुकसान फळबाग व तुरीसह इतर पिकांना फुलोरा आला आहे.अशा पिकाचे धुळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.धुळीमुळे ग्रामस्थांना गंभीर आजाराला सामोरे जाण्याची शक्यता आहे.धुळीमुळे श्वसानाला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.त्याच बरोबर अ‍ॅलर्जी,दमा यासारखे गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. ----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या