Ticker

6/recent/ticker-posts

आदर्शगाव सराटेवडगांव- आनंदवाडीसाठी इलेक्ट्रॉनिक घंटागाडीचे ॲड.चंद्रकांतभाऊ आजबे आणि दिपक पाटील यांंच्या हस्ते लोकार्पण

उत्तम बोडखे,आष्टी. -------------- आष्टी तालुक्यातील आदर्शगाव सराटेवडगांव- आनंदवाडी येथे आयसीआयसीआय फाऊंडेशन,ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून विविध विकास कामे झाली आहेत. सद्या ही दोन्ही गावे कार्बनमुक्त करण्याचा मानस आयसीआयसीआय फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शन आणि अर्थसहाय्यातुन सुरू आहे.कार्बनमुक्त होणारे हे राज्यातील पहिलेच असेल असे आयसीआयसीआय फाऊंडेशनचे झोनल हेड दिपक पाटील यांनी सांगीतले. आदर्शगाव सराटेवडगांवाला कचरा इलेक्ट्रिक घंटागाडी देण्यात आली.या घंटागाडीचे लोकार्पण आ.बाळासाहेब आजबे यांंचे वडीलबंधु ॲड.चंद्रकांतभाऊ आजबे आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनचे दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयसीआयसीआय फाऊंडेशनची सर्व टिम,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या ३ वर्षांपासून आयसीआयसीआय फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत सराटेवडगाव- आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून विविध उपक्रम राबवले जात आहेत.यामध्ये कार्बन मुक्तगाव हा उपक्रम सध्या सुरू आहे.कार्बन मुक्तगाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या गावात १२०० मिटर नदी खोलीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे परिसरात पाणीपातळी वाढली आहे.बंधारा दुरूस्ती,कार्बन मुक्तगाव उपक्रमासाठी गावातील २५१ कुटुंबाला धुररहित चुली देण्यात आल्या आहेत.सेंद्रिय शेती, गांडूळखत प्रकल्प १२५ कुटूंब,ओला कचरा,सुका कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी,दुग्धव्यवसाय प्रशिक्षण,शेळीपालन प्रशिक्षण आदी उपक्रम या गावामध्ये राबविण्यात येत आहेत.याच उपक्रमांतर्गत गावातील ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी आयसीआयसीआय फाऊंडेशनने इलेक्ट्रिक घंटागाडी या दोन्ही गावांसाठी उपलब्ध करून दिली आहे.या घंटगाडीचे लोकार्पण आज शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.या कार्यक्रमास अॕड.चंद्रकांतभाऊ आजबे,आयसीआयसीआयचे झोनल हेड दिपक पटील,संदिप सुंबरे,माजी सरपंच प्रा.राम बोडखे,चेअरमन बबन नन्नवरे,माजी चेअरमन राजाराम नन्नवरे
, सेवा सह,संस्थेचे संचालक शेख अन्सारभाई, आयसीआयसीआयचे चेतन पाटोळे,यशवंत बहिरम,माजी पंचायत समिती सदस्य भानुदास बोडखे,सरपंच कोमल भीमराव बोडखे,उपसरपंच उषा तरटे,माजी सरपंच सौ.भारती सुंबरे,महेश बोडखे,शिवदास नन्नवरे,बबन पाटील सुंबरे,श्रीरंग मिसाळ, लक्ष्मणबुवा बोडखे,विष्णु नन्नवरे,शरीफखाॕन पठाण,रामभाऊ बोडखे,तानाजी सुंबरे,शेख फारुक,नवनाथ बोडखे,हरि बोडखे,बापुराव सुंबरे,ह.भ.प.सुखदेव बोडखे महाराज,रुईनालकोलचे सरपंच तात्यासाहेब नालकोल,गणेश खिळे, निळकंठ सुंबरे,नारायण बोडखे, इंजि.बाळासाहेब बोडखे यांंच्यासह ग्रामस्थ व आयसीआयसीआय फाऊंडेशनची संपुर्ण टिम उपस्थित होती.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच भीमराव बोडखे यांनी तर आभार माजी सरपंच निळकंठ सुंबरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या