Ticker

6/recent/ticker-posts

जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी यांना पुत्रशोक; आपघातात जखमी होऊन संदेश कोठारीचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) दहा दिवसांपूर्वी १६ नोव्हेंबरच्या रात्री चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर चारचाकी गाडी उलटल्याने एक जागीच ठार तर तीन जण जखमी झाले होते. जखमी संदेश कोठारी यांंच्यावर संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
होते.आज संदेश कोठारी (वय ३९ ) याचे निधन झाले.ही बातमी जामखेड परिसरात पसरताच सगळीकडे शोककळा आहे.संदेश कोठारी हे जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी यांचे सुपुत्र होते. भयान अपघातात अरुण मोरे (४५, रा.घोगरगाव,श्रीगोंदे) हा जाग्यावरच मृत पावला होता आणि यातील जखमी संदेश कोठारीचे आज निधन झाले आहे.रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा.(जामखेड) हे जखमी होते.कोठारी आपल्या मित्र परिवारासह गुरुवारी दि.१६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर चार चाकी गाडीने क्रमांक एम.एच.१६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येथे येत होते. दरम्यान,हिंगोणे (ता.चाळीसगाव) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली होती यातील अरुण मोरे (४५, रा.घोगरगाव,श्रीगोंदे) हा जाग्यावरच मृत पावला होता तर संदेश कोठारी संभाजीनगर येथे उपचार घेत होते.आज त्यांचेही निधन झाले आहे. यामुळे मृतांची संख्या दोन झाली आहे.गाडी झाडात अडकल्याने यातील प्रवाशांना बाहेर काढता येत नव्हते. दरम्यान,खासदार उन्मेष पाटील चाळीसगावकडे जात असताना ते घटनास्थळी थांबले.तत्काळ चाळीसगाव येथून रुग्णवाहिका व कटर मागविले होते.गाडी कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढले.चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर यात अरुण मोरे (४५)रा.घोगरगाव यांचा मृत्यू झाला तर संदेश सुनील कोठारी (३९) यांचे आज निधन झाले आहे.रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५),सुजित सुनील अवसरकर (३७,तिघे रा.जामखेड) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.संदेश कोठारीच्या निधनाची वार्ता जामखेड परिसरात समजताच एकच शोककळा पसरली आहे.संभाजीनगर येथून मृतदेह जामखेड येथे आणण्यात आला. संदेशच्या पाठीमागे पत्नी,एक मुलगा,दोन मुली,आई वडील,एक बहीण (विवाहित ) असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या