

आष्टी (प्रतिनिधी)
हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विविध सण उत्सवांना महत्त्वाचे स्थान
आहे.या उत्सव आणि सणांमधूनच मनुष्याला नवीन ऊर्जा प्राप्त होत असते.नवीन जगण्याचे
बळ आणि शक्ती निर्माण होत असते.याच अनुषंगाने वर्षभरामधील दीपावली हा सण सर्वात
मोठा आणि उत्साहवर्धक म्हणून मोठ्या खुषी आणि आनंदाने साजरा करण्याची परंपरा
आहे.अशा या दीपावलीमध्ये विविध सजावटीत केल्या जातात त्यात रांगोळींना महत्त्वाचे
स्थान आहे.आष्टीच्या डॉ.शिवानी उत्तमराव बोडखे यांनी काढलेली रांगोळी आष्टीकरांसाठी
विशेषतः आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.डॉ.शिवानी ही ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे
यांची कन्या आहे.तिला रांगोळीचा छंद आहे.तीने अनेक ठिकाणी आणि विशेषतः सण समारंभ
उत्सव याप्रसंगी सुंदर रांगोळीचे रेखाटन केलेले आहे. शुभ दीपावलीच्या
पाडव्यानिमित्त घरासमोर येऊन सुंदर अशा प्रकारची रांगोळी काढली आहे.या रांगोळीचे
वैशिष्ट्य म्हणजे यातून विविध भाव व्यक्त होतात. पाहताक्षणी या रांगोळीला आनंदाचा
आणि उत्साहाचा भाव निर्माण होतो.डॉक्टर पेशात असुनसुद्धा शुभ दिपावलीच्या समोर
सुंदर विविध रंगांनी विविध छटा असलेली रांगोळी काढून डॉ.शिवानी उत्तम बोडखे हिने
वाहवा मिळवली आहे.डाॕ.शिवानी रांगोळी काढताना तिची आजी रंगुबाई बोडखे या आनंदाने
कौतुक करत होती.दरम्यान,डाॕ.शिवानीचे कौतुक करत आष्टीतील मान्यवर आणि
कलाक्षेत्रातील बांधव आणि महिला भगिनी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या