
उत्तम बोडखे,आष्टी.
-------------
आपल्या खास विनोदी प्रतिभाषाली शैलीत आणि तितक्याच गोड मधुर वाणीतून शुभ दीपावली पाडव्याच्या पार्श्वभूमीवर बहारदार संगीतमय गीतांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याच्या प्रबोधनाचा नवा तेजस्वी मंत्र गोंधळी लोक कलावंतांच्या माध्यमातून आष्टीत पार पडला;या उत्तम गीत गायनाच्या कार्यक्रमाला आष्टीकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण.
समाजातील गोरगरीब समाजाच्या जीवनामधील अंध:कार नाहीसा होऊन प्रकाश निर्माण व्हावा यासाठी सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम केले. अंधश्रद्धा रुढी परंपरा आदीसह धर्म,पंथ,
विषमता आदी जुन्या चालीरितीवर आपल्या संगीतमय गायनातुन प्रचंड प्रहार करून समता ऐक्य बंधुत्व आणि राष्ट्रीय सर्व धर्म समभाव ही मूल्य जपण्यासाठी अनेक वर्षापासून लोककलेच्या माध्यमातून धडपडत असलेले आष्टी शहरातील तरटे,शिंदे,धुमाळ,
गरडकर,चव्हाण यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त गोंधळी गीतांतुन समाजप्रबोधन केले.
गोंधळी कलावंतांची लोककला जिवंत ठेवण्यासाठी धडपड आहे. आष्टी तालुक्यातील दिपक शिंदे,सुनिल तरटे,भरत तरटे,सोमीनाथ धुमाळ ,
बाबासाहेब गरडकर,
अजय तरटे,भरत चव्हाण , सुदर्शन चव्हाण,परमेश्वर चव्हाण आणि रामेश्वर चव्हाण हे गोंधळी गीतातून विविध धर्म,सण,उत्सव यातून मनोरंजन आणि प्रबोधन करतात. यांची या लोककला क्षेत्रात अनेक वर्षापासूनची परंपरा आहे.सुमधुर आवाज त्या गायन केलेला उत्तम असा संगीताचा बाज रसिक जणांना ऐकण्यास भाग पाडतो.केवळ मनोरंजन नव्हे तर त्यातून मानवी समाज व्यवस्थेला योग्य समतादायी शिकवण देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यास स्मरून समाजामध्ये ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी बनवणे.आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या आष्टी,
पाटोदा,शिरूर तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जामखेड,
करमाळा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शहर आणि गावांमध्ये जागरण गोंधळाचे कार्यक्रम केले आहेत.दरम्यान झुंजारनेता प्रतिनिधीने या लोककला क्षेत्रामध्ये आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या या गुणी गोंधळी कलावंतांशी भेट घेऊन संवाद साधला.
दरम्यान, प्राचीन काळापासूनच लोककलेची महत्त्वाची भूमिका समाज सुधारण्यामध्ये असून सद्यस्थितीत शासनाने लोककला जपण्याची भूमिका घेऊन दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने राज्य विभाग जिल्हास्तरावर लोककला स्पर्धा घेऊन आर्थिक स्थैर्य द्यावे अशी मागणी गोंधळी कलावंतांनी केली आहे.
-----------------
0 टिप्पण्या