Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्ह्याच्या मातीत महाराष्ट्र केसरी घडविण्याची ताकद --- माजी आ.भीमराव धोंडे ----------------- खोकरमोहा येथे माती आणि मॅटची कुस्ती संपन्न.

बीड जिल्ह्याच्या मातीत महाराष्ट्र केसरी घडविण्याची ताकद आहे.आतापर्यंत बीड जिल्ह्याने राज्याला दोन महाराष्ट्र केसरी देण्याचे काम केले आहे.बीड जिल्ह्याच्या मातीत महाराष्ट्र केसरी घडविण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि बजरंग बली युवक व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्दमाने खोकरमोहा येथे बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणी २०२३ या स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह गजानन साखर कारखान्याचे रविंद्र क्षीरसागर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख,जि.प.सदस्य मदन जाधव,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,आदर्श पत्रकार संघाचे गोकुळ पवार,सतिश मुरकुटे,सरपंच देवा गर्कळ,सुधाकर मिसाळ,सावळेराम जायभाये,संतोष गोल्हार यांची प्रमूख उपस्थिती होती. पुढे बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की,कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांसह खेळाडूंना नोकरीची थेट संधी उपलब्ध आहे.तरुणांनी आपल्या शारीरिक मेहनतीच्या जोरावर कसरतीच्या खेळात सहभागी होऊन जिल्हा,राज्य,राष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे असा सल्ला देखिल त्यांनी दिला.या स्पर्धेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने नामांकित विवीध वजनी गटात सहभागी झाले होते.या स्पर्धेचे आयोजन कुस्तीगीर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा खोकरमोहाचे भूमिपुत्र पैलवान संभाजी मिसाळ यांच्यासह सहकाऱ्यांनी यशस्वीपणे केले होते.यावेळी पैलवान संभाजी मिसाळ,शिवाजी मिसाळ, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,बाळासाहेब शेंदुरकर,जि.प.चे माजी सदस्य गहीनाथदादा सिरसाट,काकासाहेब गर्जे,संतोष गोल्हार, यासीन शेख,किशोर खोले,देवा गरकळ,पत्रकार गोवर्धन जाधव,पत्रकार उत्तम बोडखे,सावळेराम जायभाये,सुनिल तोडकर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाहीर अनिल तिवारी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या