


आष्टी.
संतानी भक्ती केली आणि देवाने अनेक अवतार घेऊन चरित्र केले म्हणुन अलौकिक
कार्य करणाऱ्यांचेच मग ते धार्मिक क्षेत्र असो अथवा सामाजिक क्षेत्र असो
लोकहितासाठी झटणारे नेते असो अथवा देश पारतंत्र्यातुन स्वतंत्र करणारे राष्ट्रभक्त
असो त्यांचे अलौकिक कार्य आहे. संत व देवाचे चरित्र असते सामान्यांचे चरित्र
नसते.संत,देव आणि अलौकिक कार्य करणाऱ्यांचेच चरित्र होत असते असे प्रतिपादन
ह.भ.प.भाऊसाहेब यादव महाराज यांनी केले. ह.भ.प.यादव महाराज म्हणाले की,लोभ
नसलेले,निष्काम व लोकहितासाठी झटणा-यांच्याचा मागे समाज येत असतो.मराठा योध्दा मनोज
जरांगे पाटील यांंच्या पाठीमागे समाज का आला ? तर जरांगे हे निस्वार्थी आणि
लोकांसाठी आंदोलन करत आहेत.नवविधा भक्ती ज्या घरात होत असते तेथे भगवंताचे आगमन
होत असते.काम क्रोध व लोभ हे तीन विकारा गेल्याशिवाय खरी देवाची भक्ती करता येत
नाही.पापाचा बाप लोभ असतो.भगवंताचा सहवास फक्त पुर्व पुण्याईने मिळतो.पुतणा
राक्षीशीनीला कृष्णाला स्तनपान करण्याचेही भाग्य हे पुर्व पुण्याईने लाभले.संत हे
जगताच्या उध्दारासाठी,हितिसाठी मृत्यू लोकात येतात.गुरु देवापेक्षा श्रेष्ठ
असतो,गुरुची निंदा केलेली सहन करु नये.ब्रम्हहत्या,गोहत्या,स्रीहत्या आणि सोने
चोरणे ही महापातके आहेत असे सांगीतले. आष्टी तालुक्यातील बेलगांव येथे रेणुका माता
देवी मंदिर आवारात दि.१५ ते २३ आक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त
आयोजित हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.बेलगाव आणि
परिसरातील भाविकांचे आराध्यदैवत रेणुकाई मातेच्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे
शारदीय नवरात्र उत्सव प्रचंड उत्साहात झाला.या महोत्सवात भजन,कीर्तन
व्याख्यान,महाप्रसाद आदीसह अध्यात्मिक कार्यक्रम झाले.या सर्व धार्मिक कार्यक्रमांस
हजारो भावीकभक्त उपस्थित होते. हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी नवरात्र महोत्सव
संयोजक समिती आणि बेलगांव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.श्री क्षेत्र माहूरगड ते
बेलगांव असा ५०० कि.मी.अंतर पाच दिवस पायी चालून बेलगांव येथील ७० युवक मोठया
श्रद्धेने पायी ज्योत आणली.गेली १३ वर्षांपासून पायी ज्योत आणली जाते.या ज्योतीची
बेलगावातून मिरवणूक झाली.या महोत्सवात किर्तनकार ह.भ.प.वेदिकाताई तावरे,ह.भ.प.आनंद
महाराज जोगदंड,ह.भ.प.शंकर महाराज शिंदे ,ह.भ.प.शिवशाहीर कल्याण महाराज
काळे,ह.भ.प.रवि महाराज बबन काळे,ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर,ह.भ.प.अर्जुन महाराज
लाड,ह.भ.प.शिवचरित्रकार सागर महाराज दिखे यांचे कीर्तन झाले.सोमवार दि.२३ ऑक्टोबर
रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. भाऊसाहेब महाराज यादव आळंदी देवाची यांचे सुश्राव्य
काल्याचे किर्तन झाले.त्यानंतर महापंगत झाली.यावेळी राजकीय,सामाजिक,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या