आष्टी.
आष्टीत मनसे आणि जगदंबा तरूण मंडळाच्यावतीने आयोजित रांगोळी स्पर्धेला मोठा
प्रतिसाद दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर आणि
जगदंबा तरूण मंडळातील सदस्यांनी नवदुर्गा प्रतिमेच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले
होते.यामध्ये सहभागी स्पर्धकांनी सुबक रांगोळी काढून सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी
मनसेने व जगदंबा तरूण मंडळातील सदस्यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात
सहभाग नोंदवला स्पर्धक ही अशा वेगवेगळ्या उपक्रमाने आनंद व्यक्त करताना दिसले
यावेळी मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर आणि जगदंबा तरूण मंडळाच्या
वतीने पुढील वर्षी या स्पर्धेला अजून मोठ्या प्रमाणात स्वरूप देण्याचा मानस
असल्याचे सांगितले या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून चित्रकलेचे टकले यांनी काम
पाहिले.
0 टिप्पण्या