Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई - बीड ट्रॕव्हल्स बसला अपघात सहा जण ठार.

आष्टी. आष्टी तालुक्यात काल रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले.दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला. यात पहिला अपघात रुग्णवाहिका आणि मालट्रकचा झाला, तर दुसरा अपघात हा सागर ट्रॅव्हल्स नावाच्या खाजगी बसचा झाला आहे.दोन्ही अपघातात आतापर्यंत १० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. धामणगावहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दौलावडगावजवळ असलेल्या बँकॉक कंपनीकडे वळत असताना ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. यात डॉक्टरसह चौघा जणांचा मृत्यू झाला आहे तर जामखेड अहमदनगर मार्गावर आष्टा हरिनारायण फाट्याजवळ सागर ट्रॅव्हल्स या खाजगी बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली.या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.९ जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात इतका भयंकर होता की, प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.या अपघाताची माहिती मिळताच आ.सुरेश धस,संजय कोठारी
, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना मदत कार्य केले.या अपघातग्रस्त प्रवाशांना मदत पोहोचविण्याचे काम केले.या अपघातामुळे बीड- नगर राज्य महामार्गावर प्रचंड गर्दी झाली होती.यात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामही झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या