आष्टी
तालुक्यातील कोयाळ येथे श्रीराम मंदिरात चांडाळ चौकडी फेम ह.भ.प.बाळासाहेब उर्फ
भरत शिंदे महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन मंगळवार दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार
असल्याची माहिती कोयाळचे सरपंच सागर राजाभाऊ दरेकर यांनी दिली.संपूर्ण
महाराष्ट्रात विनोदाचा हास्यकल्लोळ उडविणारे कलावंत ह.भ.प.बाळासाहेब शिंदे महाराज
यांनी चांडाळ चौकटीच्या करामती या वेब सिरीज द्वारे महाराष्ट्रातील घराघरांमध्ये
हास्याचे फवारे उडविले आहेत.ह.भ.प.शिंदे महाराज हे नामवंत कीर्तनकार आहेत.या वेब
सिरीजमध्ये त्यांनी विनोदी आणि आगळीवेगळी भूमिका जरी केली असली तरीही ते वास्तव
जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे कार्य
करीत आहेत.वेब सिरीज ही फक्त प्रेक्षकांना हसविण्यासाठी असते.
वास्तव जीवनात ते
अनेक वर्षापासून कीर्तने करून समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहेत.त्यांचे कोयाळ
येथील श्रीराम मंदिरामध्ये मंगळवार दि.३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ ते ११ यावेळात
हरीकिर्तन होणार आहे.या हरिकीर्तनाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
सरपंच सागर राजाभाऊ दरेकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या