आष्टी.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगर येथे रुग्णाला घेऊन


जात असताना दौलावडगाव जवळ दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि मालट्रक यांचा रात्री ११ वाजण्याच्या दरम्याहाससहासस अपघात झाला.यामध्ये सांगवीपाटण येथील डॉ.राजेश झिंजुर्के (वय ३८)आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (रा.धामणगाव)अन्य दोन जण असे चार जण ठार झाले आहेत.एका जखमीवर उपचार सुरु आहेत.या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते.आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र.एम.एच.२१ एक्स ८६००) हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता.रात्री ११ वाजेदरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र.एम.एच.१६ क्यू.९५०७) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे (वय ३५ रा.धामणगाव)मनोज पांगु तिरपुडे,पप्पु पांगु तिरखुंडे दोन्ही राहणार जाटदेवळा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे,पोलीस उपनिरीक्षक सातव,सहाय्यक फौजदार रोकडे,पोलीस शिपाई केदार,शिरसाट,चालक पोलीस शिपाई कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमी व मयत यांना अहमदनगर येथे दवाखान्यात पाठविले. अपघातग्रस्त दोन्ही वाहणे रस्त्यातून बाजुला केले असून वाहतुक सुरळीत सुरु आहे.पुढील कारवाई करीत आहोत.
0 टिप्पण्या