
मुंबई
राज्यात गाव गाड्यांच्या समस्या सातत्याने सरकार दरबारी मांडणाऱ्या सरपंच
परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची राज्य बैठक ग्रामविकास मंत्री ना.गिरीश
महाजन यांच्या मुंबई येथील सेवासदन बंगल्यावर पार पडली एक परिषदेचे शिष्टमंडळ
पद्मश्री पोपटराव पवार आणि सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या
नेतृत्वात राज्य पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते. या बैठकीस पोपटराव पवार,
प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,प्रदेश उपाध्यक्ष ॲड.विकास जाधव,विश्वस्त आनंद
जाधव,राज्य प्रसिध्दीप्रमुख बापू जगदाळे,राजमल भागवत,जे.डी.टेमगिरे, अंबादास
गुजर,सतीश सतीश ढवळे,चंद्रकांत पाटील,नारायण कदम,अंजनाताई गोविंद गायकवाड,गजानन
कदम आदी उपस्थित होते.यावेळी सरपंच परिषदेच्यावतीने गावपातळीवर येणाऱ्या अडचणी व
काही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने नवीमुंबई येथे
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे सरपंच भवन निर्माण करणे,आपत्कालीन उपयोगासाठी
ग्रामपंचायतींना १० लाखांपर्यंत आरक्षित निधी उपलब्ध करुन देणे,सरपंच व उपसरपंच
यांना मोफत बसप्रवास (एस.टी.प्रवास), विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणुकीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणे,मानधनात वाढ
करणे,घरकुल योजने बाबतच्या समस्या, वित्तआयोगातील रक्कमेच्या खर्च यांसह इतर ही
मागण्यांबाबत यावेळी चर्चा झाली. ग्रामपंचायत हा ग्रामविकासाच्या दृष्टीने पायाभूत
घटक आहे.या मागण्यांचावतीने शासनाच्या सकारात्मक विचार केला जाईल असे ग्रामविकास
मंत्री ना.गिरीश महाजन यावेळी म्हणाले. याच बैठकीतून त्यांनी ग्रामविकासचे प्रधान
सचिव यांना या मागण्या तातडीने मार्गी लावण्या बाबतच्या सूचना दिल्या.
0 टिप्पण्या