Ticker

6/recent/ticker-posts

सरकाराकडुन गोरगरीब शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या प्रश्न सुटेनात ; आता आपण मैदानात उतरुन पडणार नाही तर अनेकांना पाडणार.... ------------------------ पंकजाताई मुंडे यांची भगवान भक्तीगडावरुन गर्जना

उत्तम बोडखे, (भगवानभक्तीगड सावरगांवघाट) ------------------------ उन्हातान्हात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लाखोंच्या संख्येने आलात.तुमच्यासमोर मी नतमस्तक होते असे सांगत शिवशक्ती भव्यतेकडून दिव्यतेकडे गेली.आपण आयुष्यभर राष्ट्रसंत भगवानबाबांच्या आशीर्वाद आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला स्वाभिमान आणि संस्काराचा मंत्र जपण्यासाठी अखंड रस्त्यावर राहू असा शब्द देत आपला आवाज कोणी दाबू शकणार नाही! इथे सर्व समाजाचे लोक आले आहेत. ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.तुम्ही उन्हात तळपत असताना सत्तेत आणि सावलीत बसणारे मुंडेंचे रक्त असू शकत नाही!असे भावनिक अन् सडेतोड स्पष्ट बोल सुनावत तुमच्यासाठी लोकनेते मुंडेसाहेबांनी पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी सदैव रणांगणात उतरले आहे असा रोखठोक इशारा देत सरकाराकडुन गोरगरीब शेतकरी,ऊसतोड कामगारांचे प्रश्न सुटेनात असा आरोप करीत आता आपण मैदानात उतरुन पडणार नाही तर अनेकांना पाडणार आहोत अशी गर्जना भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव, माजी मंत्री तथा गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन केली. पाटोदा तालुक्यातील सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या लाखो जनसागरांच्या विराट जन्मसमुदायाला दसऱ्याच्या शुभेच्छा देत राष्ट्रसंत भगवानबाबांच्या पवित्र मंचावरून सरकारला ईशारा दिला. दसरा मेळाव्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा जपत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा भगवानगडावरून भगवान भक्तीगडावर आल्यानंतर ही परंपरा पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच जबाबदारीने पार पाडली.आजच्या दसरा मेळाव्याच्या मंचावरून सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरच्या मंचावर संत भगवानबाबांच्या मूर्तीची विधिवत पूजा केल्यानंतर लाखो जनसागराला त्या संबोधित करीत होत्या. या मंचावर खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील,यशश्री मुंडे,माजी मंत्री महादेव जानकर,आ.नमिता मुंदडा,आ.मेघनाताई बोर्डीकर, आ.मोनिकाताई राजळे,आ.सुरेश धस, आ.रत्नाकर गुट्टे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.शिवाजी कर्डिले,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,रमेश आडस्कर, सर्जेरावतात्या तांदळे,प्रकाश महाजन, रिपाइंचे नेते बाळासाहेब साळवे, समाजसेवक विजय गोल्हार,संदेश सानप,ॲड.प्रतिकदादा खेडकर,डाॕ. अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे, ह.भ.प.राधाताई सानप महाराज, ह.भ.प.डॉ.पानेगावकर,सभापती सुवर्णाताई लांबरुड,माऊली जरांगे, रामराव खेडकर,प्रकाश खेडकर, रामदास बडे,संतोष राख,ॲड.सुधीर घुमरे,ॲड.साहेबराव म्हस्के,सतीश शिंदे , गोरख रसाळ,मुरलीधर ढाकणे,अरुण मुंडे,देविदास शेंडगे,रामचंद्र सानप आदीसह विविध क्षेत्रातील विविध ज्येष्ठ नेते,कार्यकर्ते आणि भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. पंकजाताई मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की,आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत हे लेकरं म्हणत आहेत राष्ट्रसंत भगवानबाबांनी आपल्यावर सावली धरली आहे.ऊन आपल्याला नाही.आता आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर ऊन्हात बांधू.आता माझी माणसं ऊन्हात राहणार नाहीत.आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत.आता माझी माणसं भगवान शिवाचं रुप आहेत.शिवशंकर खूप भोळा आहे पण त्यालासुद्धा तिसरा डोळा आहे असा इशारा दिला.आजच परमपुज्य मोहन भागवत यांचा दसरा मेळावा झाला.त्यांनी सांगितलं की,नीतीमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं हे देशाच्याहिताच नाही.हे पार्टीनेसुध्दा लक्क्षात घ्यावे असे सांगत पंकजाताई म्हणाल्या की,आपण ग्रामविकास मंत्री असताना जात पात आपला,विरोधी असा भेदभाव न करता मी भरापुर काम केले तरी मी पराभुत झाले.निवडणुकीत हार-जीत असते.पराभुत झाले तर मग काय झालं ? राजकारणात पडतातच ना लोकं? कधीतरी पडतात ना ? माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावं लागेल की नाही? या कुबड्या एक तर मला पार्टी देऊ शकते किंवा जनता देऊ शकते.माझ्या जनतेने मला एवढ्या कुबड्या दिल्या की, दोन महिन्यात मला मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याची ताकद तयार झाली असे सांगत पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मी मनाने कधीच खचले नाही.मला कधीच वाटलं नाही की,माझ्या तसूभर काही कमी आहे.मला एकच वाटलं की,तुमच्या सेवेत खंड आला.हात जोडून मी माफी मागते.माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो.हे मंचावरच्या लोकांना तेवढा त्रास होत नसेल. ज्यांना पद,प्रतिष्ठा मिळते त्यांचं भागून जातं पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो असं पंकजाताई कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या.दरवेळी तुम्ही आशा अपेक्षा ठेवता.दरवेळी तुम्हाला वाटतं, आमची पंकजाताई अमूक,आमची पंकजाताई तमूक,पण दरवेळी तुमचा अपेक्षाभंग होतो.मी जेव्हा दोन महिन्याची रजा घेतली.माझ्यामध्ये फक्त नितीमत्ता आहे.गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून हिंमत आणि माझ्या लोकांवरचा असलेला विश्वास असं पंकजाताई म्हणाल्या.पंकजा मुंडे हीची निष्ठा एवढी लेचीपेची नाही.माझ्यावर रोज आरोप होतो.कुणी म्हणतं पंकजाताई या पक्षात चालल्या,कुणी म्हणतं पंकजाताई त्या पक्षाच चालल्या,कुणी म्हणतं आम्हाला असं कळलं,कोणी म्हणतं आम्हाला तसं कळलं.पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही.पदं देवून तुम्हाला ती मिळवता आली नाही.पदं न देता निष्ठा काय असते ती या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात झाले.१० वेळा यांचे स्वप्न तुटले तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहे असेही यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाल्या.निवडणुकीत पराभुत (पडले) तर पराभुत झाले तर झाले, कोण पडत नाही ? ब्रह्मा,विष्णू,महेशसुद्धा युद्धांमध्ये हरले.भैरवांनी तर ब्रह्माचं शीर छाटुन टाकलं आहे.शिवालासुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलं आहे.विष्णुलासुद्धा संकटाला सामोरं जावं लागलं आहे.या देवांना संकट आहे, देवीलासुद्धा लाखो असुरांसोबत युद्ध करावं लागतं तर यावेळी खासदार डाॕ.प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की,पंकजाताईवर संकट येताच तुम्ही कोट्यावधी रुपये पंकजाताई ज्योतीप्रमाणे भासतात या ज्योतीमध्ये सेवा करण्याची ताकद आहे.पंकजाताईची ज्योत आणि तुमची शक्ती भविष्यात इतिहास घडवेल असे सांगून विजयादशमीनिमित्त त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. *क्षणचित्रे* ---------------
*पंकजाताईची ज्योत आणि तुमची शक्ती भविष्यात इतिहास घडवेल असा आत्मविश्वास खा.डाॕ.प्रीतमताईनी यावेळी दिला. *भगवान भक्तीगड ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष इंजि. संदेश सानप आणि सहकारी यांनी दोन्ही ताईचा सत्कार केला. *गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर संघटनेच्यावतीने तसेच आ.सुरेश धस,रमेश आडसकर इतरांनी तलवार देऊन सत्कार केला. *देविदास शेंडगे यांनी पंकजाताईचा घोंगडी देऊन विशेष सत्कार केला. *रामेश्वर गोरे व सहकारी यांनी फळे भाजीची टोपली आणि विळा देऊन सत्कार केला.ही टोपली पंकजाताई यांनी डोक्यावर घेऊन फोटोसाठी पोज दिली. *मुस्लिम बांधवांच्यावतीने सलीम जहागीर आणि सहकारी यांनी सत्कार केला. *सावरगाव घाट गावकऱ्यांच्यावतीने पंकजाताईचे त्यांच्या अंगावर शहारे आले. *राज्यभरातून संत भगवानबाबा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे भक्त उपस्थित होते. *बीड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. *उपस्थितांचे आभार समाजसेवक विजय गोल्हार यांनी मानले. ********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या