

आष्टी (प्रतिनिधी)
देहाचं सार्थक करण्याकरीता जीवनामध्ये भक्तीची आवश्यकता आहे.भक्ती केल्या वाचून साधु संतांची सेवा केल्या वाचून समाधान,सुख,शांती प्राप्त होत नाही.अमूल्य किंमतीचा हा नरदेह कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुन्हा प्राप्त होत नाही. जमीन, गेलेले धन, गेलेला मित्र,गेलेली पत्नी हे सर्व पुन्हा मिळवता येते पण एकदा शरीर गेलं की पुन्हा शरीर मिळत नाही म्हणून या शरीराकडून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. अनंत जन्माच्या सुकृताने म्हणजेच पुण्याईने हा देह आपल्याला प्राप्त होतो काहींना नरदेह मिळाला नाही त्याचे महत्त्वही कळालेले नाही, काहींना नरदेह मिळाला त्याचं महत्त्वही कळालं.काहींना नरदेह मिळाला नाही परंतु त्याचे महत्त्व कळालं आणि आपण संसारी जीव असे आहोत आपल्याला नरदेह प्राप्त झाला.मिळाला परंतु नरदेहाचं महत्त्व आपल्याला कळलेलं नाही म्हणून नको त्या विषयाकडे जीवाची धाव आहे.
साधु संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर या जीवाला मी कोण आहे? मी कुठून आलोय? मला कोठे जायचे ? याची जाणीव संत करून देत असतात. ज्याला घर चांगलं व्हावं असं वाटत असेल त्यांनी इंजिनियरच ऐकलं पाहिजे, ज्याला रोग बरा व्हावा वाटत असेल त्याने डॉक्टर्स ऐकलं पाहिजे, ज्याला परीक्षेमध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण व्हावं वाटत त्याने शिक्षकांचे ऐकलं पाहिजे. ज्याला कोर्टातील आपल्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल त्याने वकिलाचं ऐकावं, आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर साधू संतांचे ऐकलं पाहिजे.मात्र ते साधुसुद्धा लक्षणाचे असले पाहिजेत. अंतरंग लक्षणाचे असले पाहिजे. बहिरंग लक्षणांनी युक्त व्यक्तीच्या जर आपण सहवासात गेलो तर मात्र आपलं कल्याण होऊ शकत नाही. देव एक आहे, जीव अनंत आहेत मात्र साधु संत काही एक आहेत. अशा लक्षण आणि युक्त असणारे संत त्यांची सेवा केल्याने जीवन सार्थकी होते.संतकृपेने भगवंताचे दर्शन तर संतसेवेने मानवी जीवन सार्थकी लागते असे प्रतिपादन
श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांनी केले.
पोपटराव घुले सर ,शिवाजी घुले,मोहन घुले यांंच्या मातोश्री वै. हौसाबाई कुंडलिकराव घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानामित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.
ह.भ.प.निळकंठ तावरे महाराज म्हणाले की, वै.हौसाबाई घुले या आदर्श माता म्हणुन समाजात नावलौकिक असलेल्या होत्या.एक व्रतस्थ जीवन जगलेले व्यक्तिमत्त्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते.वै.हौसाबाई घुले या व्रतस्थ तपस्वी व्यक्तीमत्वाचा जीवनप्रवास अगदी आनंदी गेला.तीनही मुले,
नातवंडे उच्चशिक्षीत केले.
आदर्शमाता,आदर्श आजी झाल्या. समाजातीलही एक आदर्श व्यक्तिमत्व होते.हौसाबाई घुले यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन स्वतःच्या मुलांना वाढवलं,
शिकवलं,घडवलं.
वडिलोपार्जित काही शेती असली तरी पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने प्रसंगी त्यांना काम करावे लागलं.
आपल्या मुलांना खूप शिकवायचं एवढंच ध्येय ठरवून,आलेल्या नैसर्गिक संकटांचा सामना करत त्यांनी मार्गक्रमण सुरु ठेवले.
यावेळी " बहुता सुकृती नरदेह
लाभला,भक्तिविन गेला अधोगती "
या शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ या प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला होता घेतला होता. त्याप्रसंगी बोलत असताना हा नरदेह देव दुर्लभ आहे. तुम्हा आम्हाला काकटाली न्यायाने कावळा फांदीवर बसावा आणि फांदी तुटावी तसा हा देह मिळाला आहे.संसार अनेकांनी केला रावणासारख्याचा प्रपंच पूर्ण झाला नाही तर आपल्यासारख्याचा प्रपंच पूर्ण होऊ शकत नाही. प्रपंच पूर्ण होत नाही.प्रपंचामध्ये मनुष्य कृतार्थ होत नाही.परंतु परमार्थामध्ये मनुष्य कृतार्थ होतो. समाधानी होतो सुखासाठी, शांतीसाठी परमार्थाची नितांत आवश्यकता या जीवाला आहे. हा देह कधी जाईल याचा पण भरोसा नाही.
क्षणभंगुर नाही भरवसा
व्हारे, सावध तोडा माया
अनेक राजे महाराजे त्यांनी सुद्धा सरते शेवटी प्रपंच सोडून परमार्थाची वाट निवडलेली आहे. साधुसंतांना शरण गेलेले आहेत. आपले जीवन त्यांनी कृतार्थ केलेले आहे.आदर्शमाता,आदर्श पत्नी असलेल्या वै. हौसाबाई घुले यांनी आपले मुले सुशिक्षित आणि सुसंस्कृत घडविण्याचे कार्य केलेले आहे. पोपटराव घुले सर यांचं कार्य विद्यार्थी शिकवण्याचा आहे. दुसरे चिरंजीव समाज कार्यामध्ये आहेत. तिसरे चिरंजीव शेतकरी आहेत. शेवटी मुलांनी आपल्या आई-
वडिलांची सेवा केली पाहिजे अशी या कुटुंबीयांनी आईसाहेबांची भरपूर सेवा केली असे ह.भ.प.
निळकंठ महाराज तावरे यांनी केले.गुरुकुलमध्ये पोपटराव घुले सरांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना सहकार्य लाभत आहे.अनेक समाज बांधवांच्या माध्यमातून पत्रकार उत्तम बोडखेसाहेब यांच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांपर्यंत या बातम्या पोहोचून त्यांच्यामार्फत सुद्धा गुरुकुलातील विद्यार्थ्यांकरिता सहकार्य होत आहे.पोपटराव घुले सरांनी गुरुकुलाकरीता दहा टाळ दिलेले आहेत.यावेळी आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर, यशभैय्या आजबे,राजेंद्र धोंडे,
संतोषशेठ मेहेर,डाॕ.शिवाजी राऊत,शामभैय्या धस,
आण्णासाहेब चौधरी,
विठ्ठलराव बन्सोडे,भाऊसाहेब लटपटे,दिलीपराव काळे,
काकासाहेब शिंदे,नामदेव राऊत ,
बन्सीभाऊ पोकळे,भाऊसाहेब थेटे, बबन पडोळे,विठ्ठलराव लांडगे,
महादेव पडोळे,किसनराव रासकर,
संपत सांगळे ,पवार सर,घनशाम खलासे ,तुकाराम भोसले,पांडुरंग भालके ,डी.बी.राऊत,पत्रकार उत्तम बोडखे,रघुनाथ कर्डीले,
संपतराव धोंडे,नवीन कासवा,
रामराव झांजे,ॲड.नवनाथ विधाते,
बबनराव खंडागळे,प्रा.सुभाष रासकर,राधाकिसन पोकळे आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक ,
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार सरपंच अजित घुले यांनी मानले.
0 टिप्पण्या