
आष्टी
न्यू आष्टी रेल्वेने आज न्यू आष्टीवरून अहमदनगरकडे जातांना
नारायणडोहच्या पुढे असलेल्या नगर-सोलापूर हायवेवरील गेटजवळ अचानक पेट घेतला.या
आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही परंतु आगेचे व धुराचे लोळ गगणात दिसत होते.आगीचे
कारण माञ अस्पष्ट आहे.गेल्या वर्षभरापासून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे
अहमदनगर-आष्टीपर्यंत काम पुर्ण झाले आहे. अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा दि.२३
सप्टेंबर २०२२ पासून नियमित सुरू झाली आहे. ही रेल्वे अहमदनगरवरून सकाळी ७.४५
वा.निघते.न्यू आष्टी येथे १०.१५ वा.येते त्यानंतर न्यू आष्टीवरून ११ वा.निघून
दुपारी २ वा.अहमदनगर येथे पोहचते परंतु आज सोमवार दि.१६ आक्टोबर रोजी अहमदनगर
येथूनच सकाळी १०.३० वा.गाडी सुटल्याने रूटींगप्रमाणे न येता रेल्वे लेट झाली. ही
रेल्वे पुन्हा आष्टी येथून अहमदनगर येथे जात असतांना दुपारी ३.३० वा.सुमारास
नारायणडोहच्या जवळ रेल्वे मार्गावरील गेल्यानंतरअहमदनगर-सोलापूर गेट क्रॉस करतांना
अचानचक पुढील चार-पाच बोगीला आग लागली.त्यानंतर एकच खळबळ उडाली यामध्ये कुठलीही
जिवीत हानी झाली नसून रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.आग आटोक्यात
आणण्यासाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी ,नागरीकांनी प्रयत्न करून आटोक्यात आणली
आहे.एकही टिकीट विक्री नाही सोमवार ते शनिवार नियमित अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वे
सेवा सुरूळीत सुरू आहे परंतु दर रविवारी ही डेमो पुणे येथे साफसफाई व डिजेल
भरण्यासाठी जाते.त्यामुळे सोमवारी हि रेल्वे वेळेवर न येता उशीरा येते.त्यामुळे आज
दि.१६ आक्टोबर रोजी न्यू आष्टी,कडा,न्यू धानोरा,सोलापूरवाडी,न्यू लोणी व
नारायणडोह या रेल्वे स्टेशनवरून एकही तिकीट विक्री झाली नाही.
0 टिप्पण्या