Ticker

6/recent/ticker-posts

राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश* पुण्यातील भिडे वाड्या संदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने बीडमध्ये समता परिषदेच्यावतीने जल्लोष

बीड प्रतिनिधी पुण्यातील भिडेवाड्या संदर्भातील स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका व राज्यसरकारच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.त्यामुळे लवकरच या स्मारकाचे काम सुरु केले जाणार असून आजच्या या निकालाबद्दल उच्च न्यायालयासह राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ साहेब यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानत बीड येथे समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटून समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे. पुण्यातील भिडे वाड्या संदर्भातील तेथील स्थानिक पोट दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली.भिडे वाड्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या वाड्याबाबत स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका,महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने देखील विधीज्ञांची नेमणूक करून आपली बाजू सातत्याने मांडण्यात येत होती. राज्याचे मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या पुढाकाराने पोट भाडेकरू यांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर या विषयाला गती मिळून पुणे महानगरपालिकेने सुद्धा याबाबत बैठका घेतल्या.पुणे महानगरपालिकेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्यास मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी पुढाकार घेऊन ना. छगनराव भुजबळ हे उच्च न्यायालयातील तारखांना स्वतः उपस्थित राहत होते. स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या सोबतीने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र,काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली.जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु होता. सन २०१० मध्ये याठिकाणी स्मारक करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला. त्यानंतर येथील पोट भाडेकरूंनी उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती जी.एस. पटेल व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने आज याबाबत निर्णय दिला. यासाठी राज्यशासनाच्या वतीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या लढ्याला यश आले आहे. आता पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी अनेकदा आंदोलने केली होती.याठिकाणी स्मारक उभारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतल्यानंतर याविरोधात वाड्यातील पोटभाडेकरुंकडून उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सदर जागेवर दावा करतानाच या ठिकाणी शाळा असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याने महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर असल्याबद्दल भाडेकरुनी याचिका केली होती.याठिकाणी सावित्रीबाई फुले यांची शाळा असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांनी अतिशय मेहनत घेऊन शाळा असल्याबाबत पुरावे गोळा केले होते. तसेच यासाठी कोल्हापूर विद्यापीठातील प्रा.मंजुश्री पवार यांची सुद्धा यासाठी मदत घेतली होती. भिडे वाड्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आज बीड येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड.सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून,पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.याप्रसंगी परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप,श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड.संदीप बेदरे,रंजीतभाऊ पाटील,समता परिषदेचे विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष अविनाश उगले,समता परिषदेचे शहराध्यक्ष निखिल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे,युवा नेते नितीन राऊत,माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय काळे,मनोज भानोसे,चंद्रकांत साळुंके,पियुष साळुंके,दत्ताभाऊ बोडखे आष्टी यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी,
समता सैनिक,ओबीसी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या