Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी शहरातील जगताप क्लासेसच्या वतीने नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन*

आष्टी.आष्टी शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेणारे जुनी पाण्याची टाकी जवळ असलेल्या जगताप क्लासेसच्या वतीने नवरात्रनिमित्त दि.१५ ते २३ आक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत पहिले पुष्प रविवार दि.१५ आक्टोबर रोजी ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज यांनी " अध्यात्म काळाची गरज
" या विषयावर गुंफले. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डाॕ.मधुकर हंबर्डे,किसनराव रासकर,सौ.रासकरताई,सुभाष बोरुडे महाराज , भारत होले,कुलांगे सर, कांताराव धोंडे ,जगताप क्लासेसचे संचालक प्रा. भा.दे.जगताप सर हे होते.आज सोमवारी ॲड.रत्नदीप निकाळजे यांचे कामदे विषयक मार्गदर्शन मंगळवारी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांचे कृषी विषयक मार्गदर्शन, बुधवारी प्रा.सुरेश फुले सर यांचे स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन,गुरुवारी सेवानिवृत्त शिक्षक कांतराव धोंडे सर यांचे तणावमुक्त जीवनासाठी ईश्वर चिंतन, शुक्रवारी प्रा.सज्जनराव गायकवाड यांचे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद,शनिवारी सोमनाथ आडागळे यांचे युवकांसमोरीला आव्हाने,रविवारी प्रदीप पवार यांचे अध्यात्म इणि शिक्षण तर सोमवारी " नवरात्री काव्यसंध्या " कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.या कविसंमेलनात प्रा.सय्यद आल्लाउद्दीन,कवी हरिष हातवटे,प्रा.नागेश शेलार आणि संजय शेळके या कविंचा सहभाग राहाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या